शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

निवडणुकीत वापरलेल्या ९६८ बसमधून पीएमपी मालामाल; पीएमपीला २ कोटींपर्यंत उत्पन्न प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 09:36 IST

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून 'पीएमपी' च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची ...

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून 'पीएमपी' च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची वाहतूक करण्याकरिता निवडणूक आयोगाने पीएमपीच्या ९६८ बस आरक्षित केल्या होत्या त्यात, पुण्यातील आठ आणि पिंपरी चिंचवड मधील तीन मतदारसंघ मिळून एकूण ११ मतदारसंघासाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला. यातून पीएमपीला २ कोटी ४ लाख ९६ हजार ४३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.या मार्गावर होत्या सेवा पीएमपीएलच्या बसेसचिंचवड स्व. शंकरराव गावडे सभागृह थेरगाव (पाण्याच्या टाकीजवळ) येथील १११ बस, पिंपरी ॲटो क्लस्टर सायन्स पार्क समोर चिंचवड येथे ७१ बस, भोसरी गुरुकुल इडब्ल्यूएस टाऊन हॉल घरकुल चिखली १११ बस, वडगाव शेरी राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी येथील ९८ बस, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे ६० बस, कोथरूड विश्वशांती गुरुकुल स्कूल एमआयटी पौड रोड कोथरूड येथे ७५ बस, खडकवासला सिंहगड कॉलेज आंबेगाव येथे ११२ बस, पर्वती शेट दगडूराम कटारिया हायस्कूल महर्षीनगर येथे ६३ बस, हडपसर चंद्रभागा बाबूराव तुपे साधना विद्यालय माळवाडी हडपसर येथे ११७ बस, पुणे कॅन्टोन्मेंट बीजे मेडिकल ग्राउंड येथे ६२ बस, तर कसबा पेठ गणेश कला क्रीडा केंद्र स्वारगेट येथे ११२ बस होत्या. यानुसार निवडणुकीसाठी लागणाऱ्या बसेसची सोय करण्यात आली होती.प्रवाशांचे झाले हाल  ‘पीएमपी’ च्या ताफ्यात सुमारे २००० बस आहेत. त्यापैकी १६५० बस रस्त्यावर धावतात. ही संख्या आधीच कमी होती, त्यातील चांगल्या ९६८ बस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्या होत्या. दहा लाखांच्या वरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ६८२ बसेस चालू होत्या. यात (दि. १९ ) आणि (दि. २०) नोव्हेंबर रोजी अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या त्यामुळे परिणामी निवडणुकीच्या काळात प्रवाशांची गैरसोय झाली .

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड