शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 21:25 IST

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता..

ठळक मुद्देदिवाळी बोनसला मंजुरी : संचालक मंडळाचा निर्णय, कर्मचाऱ्यांना दिलासाबडतर्फ नऊ जण पुन्हा सेवेत

पुणे : दरवर्षी दिवाळी बोनससाठी वाट पाहावी लागणाऱ्या पुणे महानगर परिवहन महांडळा (पीएमपी)तील कर्मचाऱ्यांना दोन महिने आधीच '' बाप्पा '' पावला आहे. पीएमपी संचालक मंडळाने दिवाळी बोनसवर शनिवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.पीएमपी संचालक मंडळाची शनिवारी मुख्यालयात बैठक झाली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, सीआयआरटीचे संचालक राजेंद्र सनेर पाटील, संचालक व नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे बैठकीला उपस्थित होते. पीएमपीची निर्मिती होण्यापुर्वी पीएमटी व पीसीएमटी कर्मचाऱ्यांना दोन्ही पालिकांच्या नियमांनुसार दरवर्षी बोनस दिला जात होता. त्यानुसार कंपनी स्थापन झाल्यानंतरही नियमितपणे बोनस दिला जातो. पीएमपीमध्ये सध्या सुमारे ९ हजार ३०० कर्मचारी आहेत. त्यामुळे दिवाळीपुर्वी त्यांना बोनस मिळण्यासाठी कर्मचारी संघटनांकडून प्रयत्न केला जातो. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अंसतोष निर्माण झाला होता. पण संचालक मंडळाने निर्णय घेत बोनस मंजुर केला होता. मागील वषीर्ही दिवाळीच्या तोंडावर बोनसला मंजुरी मिळाली. यंदा दिवाळीला जवळपास दोन महिने बाकी आहेत. पण गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होणार आहे. त्यामुळे या काळात संचालक मंडळाची बैठक घेता येणार नव्हती. परिणामी, बोनस रखडला असता. यापार्श्वभुमीवर संचालक मंडळाने दिवाळीपुर्वीच्या अखेरच्या बैठकीतच बोनसला मंजुरी दिली. त्यामुळे कर्मचाºयांना दिवाळीपुर्वीच बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महापौर टिळक व शिरोळे यांनी दिली.-------------बडतर्फ नऊ जण पुन्हा सेवेत तुकाराम मुंढे यांच्यासह नयना गुंडे यांनी बडतर्फ केलेल्या एकुण ३३ कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यापैकी बहुतेक कर्मचारी मुंढे यांनी बडतर्फ केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांची यापुर्वी सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले होते. त्यातील नऊ जणांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर सुनावणीसाठी पाच जण उपस्थित न राहिल्याने त्यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उर्वरीत कर्मचाऱ्यां चा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. -----------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे