शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीचा चालक अाॅनड्युटी टाईट, प्रवाशांचा जीव घातला धाेक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 17:13 IST

पीएमपीच्या मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट गर्दीच्या रस्त्यावर चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रशासनाकडून त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात अाले अाहे.

पुणे :  मद्यपान करून ‘धूम स्टाईल’ वाहन चालविणाऱ्यांची चालकांची दृश्य अनेकदा चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. पण अाज पुण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस प्रवाशांनीच हा धडकी भरविणारा अनुभव घेतला. मद्यधुंद चालकाने प्रवाशांनी भरलेली बस थेट गर्दीच्या रस्त्यावर चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. प्रवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर चालकाला बस बाजूला घेण्यास सांगत पोलिसांच्या ताब्यात दिले.

    चंद्रशेखर अहिरराव असे या बसचालकाचे नाव आहे. हा चालक खासगी ठेकेदाराकडील असून कोथरूड आगारात नियुक्तीला होता. रविवारी कात्रज-कोथरुड (मार्ग क्रमांक १०३) मार्गावर दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या चालकाची सकाळी सहा वाजता पहिली बस फेरी सुरू झाली. दोन फेऱ्या पुर्ण झाल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कात्रज येथून त्याची तिसरी फेरी होती. यावेळी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. कात्रज येथून निघाल्यानंतर बस वेडीवाकडी चालु लागली. चालकाचे बसवर नियंत्रण नसल्याचे प्रवासी वाहकाच्या लक्षात आले. पण सुरूवातीला त्याच्याकडे कुणीही फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याने बस तशीच पद्मावतीपर्यंत दामटत नेली. 

    चालकाचा बसवर अजिबात ताबा राहत नसल्याचे पाहिल्यानंतर प्रवाशांना तो मद्यधुंद असल्याचे लक्षात आले. मग मात्र प्रवाशांनी त्याला बस बाजूला घेण्यास सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष करून तो तशीच बस चालवित राहिला. अखेर वाहक व प्रवाशांनी त्याला बस बाजूला घेण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात देण्यात आले. सुदैवाने तो बस चालवित असताना रस्त्यावरील वाहनांना धडक दिली नाही. त्यामुळे प्रवाशांनाही कसलीही इजा झाली नाही. प्रवाशांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.चालक बडतर्फमद्यधुंद चालक मागील चार-पाच महिन्यांपासून कोथरूड आगारात नियुक्तीला होता. रविवारी यादिवसाची त्याची शेवटची फेरी होती. भाजी आणायला जातो असे सांगून तो मद्यपान करून आला. आता त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. - विक्रम भंवर, सुपरवायझर, खासगी ठेकेदारभाजी आणालया गेला अन्...चंद्रशेखर अहिरराव याची रविवारी दुपारी १ वाजता कात्रज येथून शेवटची फेरी होती. त्यामुळे तो वाहकाला सांगून भाजी आणण्यासाठी गेला. तोपर्यंत तो सुस्थितीत होता. त्यानंतर त्याने बसच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. भाजी आणण्यासाठी गेला तेव्हाच त्याने मद्यप्राशन केले असावे, अशी शक्यता वाहकाने व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हBus Driverबसचालक