पीएमपी चालकास वाघोलीत मारहाण

By Admin | Updated: May 13, 2017 04:51 IST2017-05-13T04:51:49+5:302017-05-13T04:51:49+5:30

टेंपोचालकाने पीएमपीएमएल बसचालकास मारहाण करून बसचे नुकसान केल्याची घटना वाघोली येथे गुरुवारी सायंकाळी

PMP driver Vagolit assault | पीएमपी चालकास वाघोलीत मारहाण

पीएमपी चालकास वाघोलीत मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
वाघोली : टेंपोचालकाने पीएमपीएमएल बसचालकास मारहाण करून बसचे नुकसान केल्याची घटना वाघोली येथे
गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेंपोचालकासह चौघांवर लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाघोली येथून बस पुण्याच्या दिशेने येत होती. उबाळेनगर बसस्टॉपवर बस उभी असताना एका टेंपोचालकाने टेंपो अडवा मारला. चालकाने टेंपो बाजूला घेण्यास सांगितला, नंतर बाचाबाची झाली.

Web Title: PMP driver Vagolit assault