पीएमपी चालकाला हडपसरमध्ये मारहाण

By Admin | Updated: October 12, 2016 02:17 IST2016-10-12T02:17:46+5:302016-10-12T02:17:46+5:30

पीएमपी चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़ अमीर रफिक शेख (वय २०) आकाश मुकेश सोनवणे

PMP driver assaulted in Hadapsar | पीएमपी चालकाला हडपसरमध्ये मारहाण

पीएमपी चालकाला हडपसरमध्ये मारहाण

पुणे : पीएमपी चालकाला शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे़
अमीर रफिक शेख (वय २०) आकाश मुकेश सोनवणे (वय २१, दोघे रा़ सय्यदनगर, हडपसर) अशी त्यांची नावे आहेत़ त्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे़
याप्रकरणी पीएमपी चालक राजेंद्र व्हंताळे (वय ४९, रा़ वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना हडपसर येथील वैदुवाडी सिग्नल चौकात सोमवारी दुपारी दीड वाजता घडली़ व्हंताळे हे कोथरुड डेपोतून बस घेऊन हडपसरकडे जात होते़ वैदुवाडी येथील सिग्नल चौकात बसला सिग्नल मिळाला असल्याने चालकाने ती पुढे नेली़ त्याचवेळी समोरुन सिग्नल तोडून मोटारसायकलवरुन चौघे जण आले़ अचानक समोर आल्याने व्हंताळे यांनी ब्रेक दाबला तरी बस मोटारसायकलला जाऊन टेकली़ यावरुन त्यांच्यात वादावादी झाली़ तेव्हा चौघांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली़ सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे़

Web Title: PMP driver assaulted in Hadapsar