शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलेसाठी पीएमपी थेट रूग्णालयात; चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे मिळाली तात्काळ मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:30 IST

१०८ वर कॉल करूनही रूग्णवाहिका नाही उपलब्ध 

ठळक मुद्देभरदुपारी रस्त्यात येत होती चक्कर; चालक-वाहकाचे होतेय कौतुक

पुणे : भरदुपारी गरोदर महिला रस्त्यातून चालत होती. पण तिला अचानक चक्कर येत होती. तेव्हा तिथून पीएमपी जात होती. चालकाने ते पाहिले आणि लगेच त्यांना पीएमपीमध्ये बसवून थेट कमला नेहरू रूग्णालयात नेले. त्यामुळे त्या महिलेवर वेळेत आणि लवकर उपचार करणे शक्य झाले. पीएमपीच्या चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे लगेच मदत झाली.ही घटना आज ( शुक्रवारी दि. १०)  रोजी नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) येथे घडली. आपल्या नोकरीची पर्वा न करता कोणतेही वरिष्ठ आदेशाची वाट न पाहता त्वरित मदत केली.  माणिक बाग परिसरात एक गर्भवती महिला भर उन्हात दुपारी १२:३० वा.चक्कर येत होती.  तेव्हा नांदेड सिटी ते डेक्कन मार्गे  पीएमपी प्रवासी घेऊन जात होती. बस मधील चालक फिरोज खान व वाहक विजय रामचंद्र मोरे यांनी बस मधील प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर महिलेस बसमध्ये बसविले. आणि बस थेट कमला नेहरु रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केली. या चालक-वाहकाच्या या कायार्चे कौतुक होत आहे. चालक यांनी डेपो मँनेजर सतीश गाटे यांच्याशी फोनवर संपर्क साधून या बाबत माहिती दिली होती. गाटे यांनी देखील महिलेला मदत करण्यासाठी बसचा मार्ग बदलण्याची परवानगी दिली. ---------------------------------------१०८ वर कॉल करूनही रूग्णवाहिका नाही उपलब्ध गरोदर महिलेने १०८ या तातडीच्या रूग्णवाहिकेला दोन-तीनदा फोन केला होता. पण त्यांची रूग्णवाहिका आली नाही. उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात होते. जर अशा तातडीच्या वेळेत योग्य वाहन नाही मिळाले, तर रूग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे तातडीच्या सेवेसाठी मुबलक वाहन असणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. --------------------मी पीएमपी चालवत असताना ती गरोदर महिला चक्कर येत होती. त्यांनी १०८ नंबरवर काँल केला होता. पण रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगितले जात होते. म्हणून आम्ही बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली आणि महिलेला रूग्णालयात नेले. - फिरोज खान, पीएमपी चालक 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलdoctorडॉक्टरpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटल