पीएमपीची दरवाढ रद्द करावी

By Admin | Updated: November 11, 2014 00:41 IST2014-11-11T00:41:22+5:302014-11-11T00:41:22+5:30

आज रिपब्लिकन पक्षाचे पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून महापौर व आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

PMP can be canceled | पीएमपीची दरवाढ रद्द करावी

पीएमपीची दरवाढ रद्द करावी

येरवडा  : पीएमपी बसच्या तिकीट दरात केलेली 2क् टक्के भाववाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाचे पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून महापौर व आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयात आज नगर रस्ता व आळंदी रस्त्यावरील बीआरटीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते सुभाष जगताप, विरोधी पक्षनेते अर¨वंद ¨शंदे, आयुक्त कुणालकुमार, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक महेंद्र पठारे, किशोर वीटकर, सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक महापालिका आयुक्त संध्या गागरे, वसंत पाटील, कार्यकारी अभियंता विवेक खरवडकर आदी उपस्थित होते. 
या वेळी डॉ. धेंडे यांनी आरपीआयच्या वतीने मोर्चा काढून पीएमपीएलच्या तिकीट दरात केलेली वाढ रद्द करण्याबरोबरच नगर व आळंदी रस्त्यावर लवकरात लवकर बीआरटी सुरू करण्याची मागणी केली. आंदोलनामध्ये शिक्षण मंडळ सदस्य बाळासाहेब जानराव, आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, नवनाथ कांबळे, उपाध्यक्ष ईश्वर ओव्हाळ, संदीप ससाणो, विनोद टोपे, छाया लोंढे, नीता अडसूळ उपस्थित होते.  डॉ. धेंडे म्हणाले, की ही दरवाढ सामान्यांना न परवडणारी आहे. पीएमपीमध्ये भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराचा कळस झाला आहे. (वार्ताहर)
 
दरवाढीस विरोध
4पीएमपीएलनी तिकीट दरात केलेली 2क् टक्के दरवाढ मागे घेण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव यांनी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टेकर यांच्याकडे केली आहे. तसेच, या दरवाढीचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला असून, दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात  आला आहे. 
 

 

Web Title: PMP can be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.