शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची बसस्थानके असुविधांचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:29 IST

‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्दे‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानकेप्रथमोपचार पेटी आणि अग्निशमन यंत्रणा एकाही स्थानकावर

पुणे : बसस्थानकांवर प्रवाशांच्या मुलभूत गरजांकडेही पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून दुर्लक्ष केले जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या ७० मुख्य बसस्थानकांपैकी मोजक्याच स्थानकांवर पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह उपलब्ध आहे. तर प्रथमोपचार पेटी आणि अग्निशमन यंत्रणा एकाही स्थानकावर नसल्याचे समोर आले आहे. ‘पीएमपी’ची पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकुण ७० मुख्य बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांची सातत्याने गर्दी असते. विविध मार्गांवरील बस या स्थानकांमार्गे जात असतात. त्यामुळे प्रवाशांसाठी पायाभुत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. परंतु पीएमपी प्रवासी मंचचे रुपेश केसेकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पीएमपी प्रशासनाने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. एकुण ७० स्थानकांपैकी केवळ ३४ स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तर २८ स्थानकांवर स्वच्छतागृह आहेत. त्यातील बहुतेक स्वच्छतागृह दोन्ही महापालिकेची आहेत. प्रवाशांना ये-जा करणाºया बसेसची माहिती व्हावी यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आवश्यक असते. पण फक्त १० स्थानकांवरही उद्घोषणा करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापार्श्वभुमीवर बसेससह स्थानकांवरही अग्निशमन यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. मात्र, पीएमपीकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही दक्षता घेतली जात नाही. बसेसमध्ये ही यंत्रणा बसविली जात असताना स्थानकांकडे डोळेझाक केल्याचे दिसते. एकाही बसस्थानकावर ही यंत्रणा नसल्याचे उत्तर पीएमपी प्रशासनाने दिले आहे. प्रथमोपचार पेटी तसेच मोबाईल चार्जिंगची सुविधाही या स्थानकांवर नाही. दररोज लाखो प्रवाशांना सेवा पुरविणाºया पीएमपीकडून सोयी-सुविधा देण्यात सातत्याने अपयश येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. -------------बसस्थानकांवरील सुविधांची स्थितीसुविधा        बसस्थानकेपिण्याचे पाणी        ३४स्वच्छतागृहे        २८ध्वनीक्षेपक यंत्रणा    १०अग्निशमन यंत्रणा    ००प्रथमोपचार पेटी        ००    मोबाईल चार्जिंग पॉईंट    ००-------------------------

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल