पीएमपी बस पडली बंद

By Admin | Updated: September 4, 2015 02:17 IST2015-09-04T02:17:51+5:302015-09-04T02:17:51+5:30

पीएमपीच्या बस बंद पडणे काही नवीन नाही. मात्र, सामान्य रस्त्याऐवजी ऐन गर्दीच्या वेळी धनकवडीच्या गुलाबनगर चौकात बस बंद

PMP bus fell off | पीएमपी बस पडली बंद

पीएमपी बस पडली बंद

धनकवडी : पीएमपीच्या बस बंद पडणे काही नवीन नाही. मात्र, सामान्य रस्त्याऐवजी ऐन गर्दीच्या वेळी धनकवडीच्या गुलाबनगर चौकात बस बंद पडल्यावर चालक-वाहक व गर्दीत अडकलेल्या वाहनांची कशी त्रेधा होते ते गुरुवारी पाहावयास मिळाले.
गुलाबनगरच्या मुख्य चौकातच बस बंद पडल्याने येथून सर्वच बाजूला जाणारी वाहने अडकून पडू लागली. चालकास बस सुरू करता येईना. या वेळी जानूबाई दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल भोसले, गौरव शिळीमकर व अन्य कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमन करून गाडीला धक्का देत बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. (वार्ताहर)

Web Title: PMP bus fell off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.