शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पीेएमपीएमएल-प्रसन्न पर्पल करार रद्द; कोथरुडमधील चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:06 IST

पीएमपीएमएलच्या खासगी बसचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पसन्न पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे.

ठळक मुद्देप्रसन्न पर्पल कराराचे पालन करीत नाही, यामुळेच मागील २ महिन्यांपासून चालकांचे पगार नाहीत२०० पीएमपी बसेसचे चालक संपावर; प्रवाशांना मनस्ताप

पुणे : मार्गावर अपेक्षित बस न आणल्याबद्दल वारंवार नोटीस बजावूनही सेवेत सुधारणा न करणे तसेच चालकांनी अचानक संप करून प्रवाशांना वेठीस धरल्याने कराराचा भंग झाल्याच्या कारणास्तव पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स या कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे. या कंपनीला चालविण्यासाठी दिलेल्या २०० बस ताब्यात घेतल्या असून, बुधवारपासून ‘पीएमपी’कडून या बस मार्गावर आणल्या जाणार आहेत.‘प्रसन्न पर्पल’ कंपनीकडील चालकांनी मंगळवारी सकाळी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे कोथरूड व पिंपरीतील नेहरूनगर आगारातून सुटणाºया सुमारे १६० बसचे वेळापत्रक काही प्रमाणात कोलमडून गेले. परिणामी सकाळच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यानंतर ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी सकाळी तातडीने बैठक घेऊन संप केल्याच्या कारणास्तव कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्याकडील २०० बसही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बस ताब्यात घेताना कुंबरे पार्क येथे कंपनीकडून मज्जाव करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने बस ताब्यात घ्याव्या लागल्या. या बसची मंगळवारी दिवसभर तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे बुधवारपासून या बस मार्गावर सोडल्या जातील, अशी माहिती मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.करारानुसार प्रसन्न कंपनीने दररोज किमान ८५ टक्के म्हणजे १७० बस मार्गावर आणणे अपेक्षित होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून एकदाही १७० बस मार्गावर आल्या नाहीत. पदभार स्वीकारल्यानंतर १९ एप्रिल रोजी कंपनीला करार रद्द करण्याबाबत नोटीसही देण्यात आली होती. त्यानंतर दोनदा कारणे दाखवा नोटीसही बजावली. परंतु, एकदाही १७० पर्यंत बस मार्गावर येऊ शकल्या नाहीत. दरम्यानच्या काळात चालकांनी अचानक संपही पुकारला होता. सातत्याने संधी देऊनही कराराचा भंग होत असल्याने त्यांना दंडही आकारण्यात आला.मात्र, मंगळवारी पुन्हा चालकांनी अचानक संप पुकारला. अपेक्षित बस मार्गावर न आणून मागील आठ महिन्यांचा काळात कंपनीने ‘पीएमपी’चे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच ‘आयटीएमएस’ यंत्रणेचेही जाणीवपूर्वक नुकसान केले जात होते. या सर्व कारणांमुळे अखेर करार रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. तसेच पीएमपीकडे काही कोटी रुपये थकीत असल्याचा ‘प्रसन्न’चा दावाही मुंढे यांनी फेटाळून लावला. उलट पीएमपीलाच त्यांच्याकडून येणे असल्याचे मुंढे म्हणाले.पीएमपीने २०० बस ताब्यात घेतल्या असून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. करारानुसार कंपनीने पीएमपी सर्व बसेस सुस्थितीत परत करणे आवश्यक आहे. त्यानुसार बसेसची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये बसेसचे नुकसान झाल्याचे आढळल्यास ‘प्रसन्न’कडून त्या रकमेची वसुली केली जाईल. तसेच त्यांची बँक गॅरंटीही सील करण्यात आली आहे, असे मुंढे यांनी सांगितले.पीएमपीकडून मागील दोन-तीन महिन्यांचे पैसे मिळाले नाही. सुमारे १० कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे चालकांचे वेतन देता आले नाही. पैशांची जुळवाजुळव करून त्यांना पैसे जात होते. पण आता चालक थांबायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे. पीएमपीने आतापर्यंत अनेकदा विविध कारणे दाखवून दंडाच्या स्वरूपात पैसे घेतले आहे. त्यामुळे आम्हाला करारातून मुक्त करावे, असे पत्र सोमवारी संचालक मंडळाला दिले होते. पण त्यांनी विश्वासात न घेता बेकायदेशीर पद्धतीने करार रद्द केला आहे. आमची पत खराब व्हावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हे पाऊल उचलले आहे.- प्रसन्न पटवर्धन, प्रमुख, प्रसन्न ट्रॅव्हल्स>काय होता करार?‘पीएमपी’ला काही वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सुमारे ५०० बस मिळाल्या होत्या. यापैकी २०० बस ‘पीपीपी’ तत्त्वावर प्रसन्न पर्पलला देण्यात आल्या होत्या. याबाबत १३ फेब्रुवारी २०१२ रोजी करार करण्यात आला होता. या कराराची मुदत दहा वर्षांची होती. या करारानुसार कंपनीने प्रवाशांना चांगली सुविधा देणे, सुमारे ८५ टक्के बस मार्गावर सोडण्याची अट घालण्यात आली होती.सेवेवर परिणाम नाही : ‘प्रसन्न’कडील चालकांनी मंगळवारी अचानक केलेल्या संपाचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. या बस केवळ कोथरूड व पिंपरीमध्ये होत्या. नियमित बसच्या तुलनेत केवळ ५० बस मार्गावर कमी होत्या. त्यामुळे केवळ काही मार्गांवर प्रवाशांची गैरसोय झाली. बुधवारी ही स्थिती पूर्ववत होईल. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंढे यांनी केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPuneपुणे