शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महापालिकेत समाविष्ट गावांतील अनधिकृत होर्डींगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 21:01 IST

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये अनेक इमारतीवर, रस्त्यांच्या लगत अनधिकृतपणे व धोकादायक पध्दतीने होर्डींग उभे आहेत.

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये अनेक इमारतीवर, रस्त्यांच्या लगत अनधिकृतपणे व धोकादायक पध्दतीने होर्डींग उभे आहेत.गावे हद्दीत येण्यापूर्वी होर्डींग उभे करताना कोणतेही निर्बंध नसल्याने वाटेल तसे, वाटेल तेथे व सर्व नियम पायदळी तुडवत होर्डींग उभी करण्यात आली आहेत. गावे महापालिकेच्या हद्दीत येऊन एक वर्षांचा कार्यकाळ लोटला परंतु याकडे देखील महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात आहे.

    पुण्याच्या मध्यवस्तीत अत्यंत रहदारीचा रस्ता असलेल्या जुना बाजार चौकात भर दुपारी रस्त्यावर सिग्नल लागल्यामुळे उभ्या असलेल्या वाहनांवर अनधिकृत लोंखडी होर्डींग कोसळले. यात चार निष्पाप लोकांचा बळी गेला. तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणानंतर शहरातील अनधिकृत होर्डींगचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराबरोबरच नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील होर्डींगचा विषय देखील अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहराच्या हद्दीलगतच्या ११ गावांचा महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली. गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होणार असल्याने व शहरालगत असल्याने गेल्या काही वर्षांत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डींग उभी राहिली आहेत. यात रस्त्यालगत असलेल्या बहुतेक सर्वच इमारतींवर क्षमतेपेक्षा अधिक उंचीची होर्डींग उभी करण्यात आली आहेत. इमारतीवर होर्डींग उभारल्याने हमखास सहज उत्पन्न मिळण्याचे चांगले साधन असल्याने होर्डींगचे पेवच आले अाहे. याशिवाय रस्त्यांच्या कडेला कोणते ही नियम न पाळता देखील होर्डींग उभे केले आहेत. महापालिकेला पडले केवळ आपल्या उत्पन्न वाढीचे    महापालिका हद्दीत ११ गावे समाविष्ट झाल्यानंतर महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरु करण्यात आले. यामध्ये या गावांमध्ये अनधिकृतपणे उभे असलेली होर्डींगकडे केवळ अधिक उत्पन्न मिळण्याचे साधन म्हणून पाहिला सुरुवात केली. यासाठी या गावांमध्ये उभ्या असलेल्या होर्डींगाचा सर्वे करुन नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु ही नोंदणी करताना धोकादायक आहेत, नियमांमध्ये बसतात का या गोष्टींचा विचार मात्र प्रशासनाकडून होताना दिसत नाही. सामाविष्ट गावांतील होर्डींगची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAccidentअपघात