शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

PMC: शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना फक्त महापालिका हद्दीपुरतीच

By निलेश राऊत | Updated: June 16, 2023 17:27 IST

महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे महापालिका हद्दीबाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात...

पुणे :पुणे महापालिकेच्यावतीने शहरातील गरीब नागरिकांना वैद्यकीय उपचारात आर्थिक मदत करण्यासाठी राबविण्यात येणारी, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना केवळ पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या व ज्यांचे उत्पन्न १ लाख रूपयांच्या आत आहे त्यांच्यासाठीच लागू आहे.

महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पुणे महापालिका हद्दीबाहेरील नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असतात. तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या पुढे आहे व ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे असे नागरिकही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. परंतु ही योजना शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, गलिच्छ वस्ती निमुर्लन सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्डधारक यांच्यासाठी आहे.

ही योजना ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा गरीब कुटुंबियासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत लागू करण्यात येत आहे. तथापि ही सवलत फक्त जे नागरीक आरोग्य विमा योजनेचे सभासद होतील त्यांच्यापुरतीच लागू राहील. तसेच ही योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू असून, सेमी प्रायव्हेट प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही.

शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटल मधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% किंवा १०० % हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हथरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादिपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक यांनी दिली.

योजनेसाठी आवश्यक कागदपदत्रे

  • झोपडपट्टीत राहत असल्याचे ग.व.नि. विभागाचे चालू आर्थिक वर्षाचे सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले पिवळे रेशनकार्ड व वार्षिक उत्पन्न एक लाखपर्यंत असलेला तहसीलदार, पुणे यांचा दाखला.
  • पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
  • आपत्यांचे आधार कार्ड ( वय वर्ष २५ खालील )
  • कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
  • कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
  • सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु.१००/- अशी एकूण रक्कम र.रु. २००/-

दरम्यान रूग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदर योजनेचे कार्ड काढून रुग्णालयात दाखल झाल्यापासूनचे लाभ मिळण्याची मागणी करीत आहेत. परंतु, शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार सदर योजनेचे सभासद कार्ड ॲडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिकाPuneपुणे