शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पिचकाऱ्या मारणाऱ्यांना धुवायला लावला रस्ता ; पुणे महानगरपालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 20:10 IST

रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून कारवाई करण्यात अाली असून अनेकांना थुंकल्याचे साफ करण्याची शिक्षा देण्यात अाली.

पुणे : वारंवार अावाहन करुनही रस्त्यावर बिंधास कुठेही पान, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला अाहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्या 19 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड तर वसूल केलाच परंतु ज्यांनी दंड भरला नाही अशांना थुंकलेल्या ठिकाणाची स्वच्छता करायला लावली. 

     दुभाजकांवर, सार्वजनिक भिंतींवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकल्याचे नेहमीच अाढळते. महापालिकेकडून वारंवार अावाहन करुनही काही महाभाग सुधारायला तयार नसतात. त्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अाराेग्य विभागाने बुधवारी स्वारगेट येथील हाेलगा चाैक ते अप्पर इंदिरानगरच्या पर्यंतच्या परिसरात धडक कारवाई करुन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड अाकारला. तसेच ज्यांनी दंड भरला नाही त्यांना जन्माची अद्दल घडावी यासाठी त्यांना थेट रस्त्याच धुण्यास सांगितला. रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 1940 रुपयांचा दंड वसूल केला.

     स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशी जरी महापालिकेचे घाेषवाक्य असले तरी शहरातील जवळजवळ सर्वच दुभाजकांवर तसेच रस्त्यांवर पान, गुटखा खाऊन थुंकल्याचे अाढळते. थुंकणाऱ्यांना काेणाचा धाक नसल्याने त्यांचे चांगलेच फावले हाेते. त्यामुळे रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्या महाभागांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली असून जे दंड भरत नाहीत त्यांना थेट रस्ताच धुण्यासाठी सांगण्यात येत अाहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBibvewadiबिबवेवाडी