शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 22:21 IST

PMC PCMC Result 2026, Vasant More Counting Status : मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रभाग ३८ मधील महत्त्वाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाच्या आशेने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत.

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ३८ मधील निकालाने मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. या प्रभागाची अधिकृत आकडेवारी अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या मतमोजणी केंद्रावर सहाव्या फेरीची घोषणा सुरू असून, अद्याप चार फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे या प्रभागाचा अंतिम कौल नेमका कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रभाग ३८ मधील महत्त्वाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाच्या आशेने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत. सातव्या फेरीपासून व्यंकोजी खोपडे आणि वसंत मोरे यांच्यात 90 मतांचा फरक होता, मात्र दहाव्या फेरीत १०३५ चा फरक आल्यामुळे वसंत मोरे यांनी आक्षेप घेतली रिकाउंटिंगची मागणी केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी काल 79 हजार 826 मतदान झाल्याची आकडेवारी प्रसिध्द होती. मात्र आत्ता एकूण 78719 मतदान झाल्याचे दाखवले आहे, तब्बल 1 हजार 35 मते कमी झाल्याचे दिसत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 38 चे उमेदवार यांनी निवडणुक निकालावर आक्षेप घेत, रेकॉर्डिंगची मागणी केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

"जोपर्यंत शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण होत नाही आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत अंतिम निर्णय सांगता येणार नाही," असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चार फेऱ्यांमधील मतांची बेरीज निकालाचे पारडे फिरवू शकते.

वसंत मोरे यांची प्रतिष्ठा पणाला पुण्याच्या राजकारणात फायरब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरे यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. प्रभाग ३८ हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रभागात चौरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये होणारी मतांची ओढाताण निर्णायक ठरणार आहे. पुढील काही तासांत प्रभाग ३८ चा अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, तोपर्यंत धनकवडी परिसरात तणावपूर्ण शांतता आणि उत्सुकतेचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Twist in Vasant More's ward; announcement of four rounds pending.

Web Summary : Pune's Ward 38 election result is awaited. Vasant More and supporters are at the counting center. Six rounds are done, four remain. Tension rises as the final outcome remains uncertain, impacting More's political standing. Official results are expected soon.
टॅग्स :Vasant Moreवसंत मोरेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना