पुण्यात भाजपसोबत सत्तेत बसण्याचा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावण्याचे अजित पवारांचे मनसुबे आजच्या मतदानाच्या कलांवरून पुरते धुळीस मिळाले आहेत. पुण्याच्याच नाही तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (BJP) एकहाती वर्चस्व गाजवत बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी झालेल्या या लढतीत भाजपने तब्बल ७४ जागांवर आघाडी घेत आपली सत्ता कायम राखण्याच्या दिशेने कूच केली आहे. दुसरीकडे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे सध्यातरी दिसत आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने (BJP+) मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार, भाजपने ९० जागांवर आघाडी मिळवत महापालिकेत आपली एकहाती सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी ८२ जागांची आवश्यकता असताना भाजपने तो टप्पा आधीच ओलांडला आहे.
पवारांच्या युतीला मतदारांनी नाकारले? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांनी प्रथमच एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र, सुरुवातीच्या कलांवरून असे दिसते की, मतदारांनी या 'पवार पॅटर्न'पेक्षा भाजपच्या विकासाला पसंती दिली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शहरात जोरदार मुसंडी मारली आहे.
पिंपरी चिंचवड...
भाजपचे वर्चस्व: चिंचवड आणि भोसरी या भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला शिरकाव करता आला नाही.
शिंदे गटाची साथ: शिवसेना (शिंदे गट) १० जागांवर आघाडीवर असून त्यांनी भाजपला सत्तेसाठी पूरक साथ दिली आहे.
विरोधकांचा सुपडा साफ: काँग्रेस आणि शिवसेना (UBT) या पक्षांना पिंपरी-चिंचवडमध्ये खाते उघडण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.
अजित पवारांना धक्का: महापालिकेवर पुन्हा एकदा 'दादां'चे वर्चस्व निर्माण करण्याचे स्वप्न धुळीस मिळताना दिसत आहे.
पुणे महापालिका...
अजित पवार-शरद पवार युतीला धक्का: पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी प्रथमच एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, केवळ २० जागांवर आघाडी मिळाल्याने हा 'पवार पॅटर्न' सपशेल फेल झाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसची अनपेक्षित कामगिरी: प्रशांत जगताप यांच्या विजयानंतर काँग्रेसने इतर प्रभागांतही १० जागांवर आघाडी मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
शिवसेना आणि मनसे 'कोरी पाटी': उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांना अद्याप कुठेही आघाडी मिळवता आलेली नाही, हे पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठे आश्चर्य मानले जात आहे.
शिंदे गटाची उपस्थिती: शिवसेना (शिंदे गट) केवळ २ जागांवर आघाडीवर असून, त्यांची पुण्यात फार मोठी जादू चालू शकलेली नाही.
Web Summary : BJP triumphs in Pune & Pimpri-Chinchwad corporation polls, crushing Ajit Pawar's ambitions. The BJP secured a majority, while Pawar's alliance faltered. Voter preference leaned towards BJP's development over Pawar's united front.
Web Summary : पुणे और पिंपरी-चिंचवड निगम चुनावों में भाजपा की जीत, अजित पवार की महत्वाकांक्षाओं को झटका। भाजपा को बहुमत, जबकि पवार का गठबंधन विफल। मतदाताओं ने पवार के संयुक्त मोर्चे पर भाजपा के विकास को प्राथमिकता दी।