पुणे: पुण्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये ७ व्या फेरीच्या मतमोजणीनंतर मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. 'बालेवाडी-बाणेर'चे मतदान मोजून झाल्यानंतर आता 'पाषाण-सूस' भागातील मतमोजणी सुरू झाली आहे, जिथे भाजपची ताकद जास्त असल्याचे दिसून येत आहे. आणखी दोन फेऱ्या शिल्लक आहेत.
लहू बालवडकरांची आघाडी५ व्या फेरीपर्यंत ३६०० मतांनी पिछाडीवर असलेले भाजपचे लहू बालवडकर यांनी ७ व्या फेरीत जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्यांनी अमोल बालवडकरांची आघाडी मोडून काढत आता ६१७ मतांची निसटती आघाडी घेतली आहे.
बाबुराव चांदेरेंना मोठा धक्का: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबुराव चांदेरे यांना मोठा फटका बसला असून ते भाजपच्या गणेश कळमकर यांच्यापेक्षा २४७९ मतांनी पिछाडीवर आहेत. कळमकरांनी घेतलेली ही आघाडी आता चांदेरेंसाठी कठीण आव्हान ठरू शकते.
भाजपचे 'पॅनल' विजयाच्या मार्गावर: ७ व्या फेरीनंतर या प्रभागात भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर असून, 'बाणेर-बालेवाडी' मधील अमोल बालवडकरांची लाट ओसरून आता पाषाण भागात भाजपचे वर्चस्व दिसत आहे.
Web Summary : Pune's Ward 9 sees a major shift after round 7. Lahu Balwadkar overtakes Amol Balwadkar. Baburao Chandere faces setback, trailing Kalmakar. BJP panel leads.
Web Summary : पुणे के वार्ड 9 में 7वें दौर के बाद बड़ा बदलाव। लहू बालवडकर, अमोल बालवडकर से आगे। बाबूराव चांदेरे पीछे, कलमाकर आगे। बीजेपी पैनल आगे।