पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी दिवसभरात इच्छुकांनी तब्बल २,८८६ उमेदवारी अर्ज विकत घेतले. अद्याप, एकाही उमेदवाराने अर्ज जमा केला नाही. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ४१ प्रभागांसाठी १६५ नगरसेवक पदांसाठी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने युती, महायुतीस आघाडी किंवा स्वतंत्र पक्षांकडून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याबरोबरच सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महापालिकेचे सहायक आयुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील निवडणूक कार्यालयातून २,८८६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र, एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय विक्री झालेले अर्ज
येरवडा कळस धानोरी - १९५
- नगर रोड -वडगाव शेरी - १९५
- कोथरूड बावधन - १९४
- औंध बाणेर - ७३
- शिवाजीनगर घोले रोड - २७५
- ढोले पाटील रोड - १७५
- हडपसर मुंढवा - १९९
- वानवडी रामटेकडी - १९९
- बिबवेवाडी - २२१
- भवानी पेठ - १९१
- कसबा विश्रामबाग वाडा - ३००
- वारजे कर्वेनगर - २२१
- सिंहगड रोड - १९७
- धनकवडी सहकारनगर - २००
- कोंढवा येवलेवाडी - ५१
Web Summary : Pune witnessed brisk activity on the first day of PMC election application sales. A record 2,886 applications were sold across 15 ward offices. No nominations were filed yet. Political parties are finalizing candidate lists for the 165 seats.
Web Summary : पुणे में पीएमसी चुनाव आवेदन बिक्री के पहले दिन भारी गतिविधि देखी गई। 15 वार्ड कार्यालयों में रिकॉर्ड 2,886 आवेदन बेचे गए। अभी तक कोई नामांकन दाखिल नहीं किया गया। राजनीतिक दल 165 सीटों के लिए उम्मीदवार सूची को अंतिम रूप दे रहे हैं।