- विश्लेषण
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये वाद विकाेपाला गेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काही काळ राजकारण सोडेन, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आधीच जाहीर केले होते. आता जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पक्षाचे माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी पालिका निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार गटासोबत आघाडी करण्यावरून पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते गोंधळात पडले आहेत.
पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ३९ नगरसेवक निवडून आले होते. तसेच दोन अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ३१, तर शरद पवार गटाकडे १० माजी नगरसेवक आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडील माजी नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे. त्यात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना ४१ नगरसेवक ज्या ठिकाणी निवडून आले. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमाकांची मते होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करणे चुकीचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार गटाबरोबर आघाडी झाल्यास अन्याय होणार असल्याची भावना आहे. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसने अजित पवार गटाबरोबर आघाडी करणार नसल्याचे जाहीर करा असे सांगितले आहे. परंतु अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबतची भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाविकास आणि अजित पवार गटाबरोबरील आघाडी बाबतची भूमिका स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
Web Summary : Disagreement over allying with Ajit Pawar's group has intensified within NCP (Sharad Pawar). Faction leaders resigned. Workers are confused about the party's stance on alliances, especially with Congress opposing it.
Web Summary : अजित पवार गुट के साथ गठबंधन को लेकर राकांपा (शरद पवार) में आंतरिक कलह बढ़ गई है। नेताओं के इस्तीफे से कार्यकर्ता गठबंधन पर पार्टी के रुख को लेकर भ्रमित हैं, खासकर जब कांग्रेस इसका विरोध कर रही है।