शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
2
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
3
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
4
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
5
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
6
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
7
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
8
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
9
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
10
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
11
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
13
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
14
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
15
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
16
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
17
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
18
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
19
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections 2026: पुण्यात साडेअकरालाच गुलाल उधळणार..! कोणत्या प्रभागांचे निकाल आधी येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:43 IST

मतमोजणीचा सर्वाधिक २० फेऱ्या धनकवडी सहकारनगर; पहिला निकाल साडेअकराच्या दरम्यान

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये होणार असून सर्वात कमी १२ फेऱ्या बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांच्या होणार आहेत. त्यामुळे पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. यासाठी ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडून येतील. यातील ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वात कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाला विलंब होऊ शकतो.क्षेत्रीय कार्यालयनिहाय दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुप्पर इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी मध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वात कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होऊन या प्रभागांचा निकाल सर्वात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल,’ असे महापालिकेचे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune PMC Elections 2026: Early results expected; counting details revealed.

Web Summary : Pune's PMC election counting will vary across wards, with some concluding faster. Expect initial results around 11:30 AM. धनकवडी-सहकारनगर wards have the most rounds, while बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग, and कोंढवा Yeolewadi will be quicker. Full picture by 2 PM.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2026