पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३ वाजता संपली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आम आदमी पार्टी (आप) वगळता एकाही राजकीय पक्षाने आपली उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. अशा पद्धतीने प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या गुलदस्त्यात ठेवण्याची आणि गुप्त पद्धतीने एबी फॉर्म देण्याची महापालिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
महापालिकेची निवडणूक तीन ते साडेतीन वर्षांनंतर होत आहे, शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांचे दोन तुकडे झाल्याने उमेदवारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात भाजपकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. सर्वप्रथम इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाजपने आघाडी घेतली होती. त्यामुळे सर्वप्रथम भाजप उमेदवारांची यादी जाहीर करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी न मिळालेले दुसऱ्या पक्षात जातील किंवा बंडाचे निशान फडकवतील, या भीतीने भाजपने उमेदवारी यादी जाहीर करणे टाळले आणि एबी फॉर्म देऊन थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले.
भाजपचा हाच कित्ता दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि मनसे या प्रमुख पक्षांनी गिरवल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी दुपारी ३ वाजता संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कोणाचीही यादी समोर आली नाही. उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवारी अर्ज भरण्याची महापालिकेच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे. केवळ आप पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. रिपाइंने मंगळवारी सायंकाळी उशिरा ९ जणांची यादी जाहीर केली, मात्र ते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढणार आहेत.
Web Summary : Pune's PMC elections saw unprecedented secrecy. Major parties, fearing defections, avoided public candidate lists, directly issuing AB forms. Only AAP revealed its list.
Web Summary : पुणे पीएमसी चुनावों में अभूतपूर्व गोपनीयता देखी गई। दलबदल के डर से प्रमुख दलों ने सार्वजनिक उम्मीदवार सूचियों से परहेज किया, सीधे एबी फॉर्म जारी किए। केवल आप ने अपनी सूची का खुलासा किया।