पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत पारदर्शकता पाळण्यात आलेली नाही. व्हीव्हीपॅट मशीनचा वापर झाला नाही, मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आली, महापालिकेचे अधिकारी व पोलिसांचे संशयास्पद वागणे होते, अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणुकीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा कळस-धानोरी या प्रभागातील उमेदवारांनी दिला आहे.
शिवसेनेचे उमेदवार गिरीश जैवळ, मीनाक्षी म्हस्के, रिपब्लिकन विद्यार्थी सेना-शिवसेनेच्या उमेदवार हेमलता बनसोडे यांच्यासह सतीश म्हस्के, विवेक बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणुकीमध्ये मतदार याद्यांनुसार ईव्हीएम मशीन देणे आवश्यक होते. मात्र, तसे मशीन ठेवण्यात आले नव्हते. मतदानावेळी पैसे वाटप होऊनही त्याकडे पोलिस-अधिकारी दुर्लक्ष करत होते. मतदानावेळी मशीन बदलण्यात आल्या, व्हीव्हीपॅट नव्हते, मशीनची बटणे दाबली जात नव्हती, हजारो मतदारांची नावे अन्य प्रभागांत टाकण्यात आली. एकाच कुटुंबातील नावे विविध प्रभागामध्ये टाकण्यात आली. उमेदवाराला त्यांच्या कुटुंबीयांचीही मते मिळू नयेत, अशीही व्यवस्था केली होती. कारभारामध्ये पारदर्शकता नसल्याने आता, त्याविरुद्ध महापालिकेसमोर आंदोलन करणार आहे. तसेच न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Web Summary : Pune candidates allege election irregularities: missing VVPATs, misplaced voter names, suspicious officials. They demand clarification from the Election Commission, threatening protests and legal recourse due to lack of transparency in the process.
Web Summary : पुणे के उम्मीदवारों ने चुनाव में अनियमितताओं का आरोप लगाया: वीवीपीएटी गायब, मतदाता नामों का गलत स्थान, संदिग्ध अधिकारी। उन्होंने चुनाव आयोग से स्पष्टीकरण की मांग की, प्रक्रिया में पारदर्शिता की कमी के कारण विरोध और कानूनी सहारा लेने की धमकी दी।