शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections 2026: आज ठरणार पुणे महापालिकेचे कारभारी; ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 07:15 IST

- मतदानाची वेळ सकाळी ७:३० ते सांयकाळी ५:३०

पुणे :पुणे महापालिकेचा रणसंग्राम अखेर अंतिम टप्प्यात आला असून, आज गुरुवारी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० यादरम्यान मतदान होणार आहे. त्यामधून पुण्याचे कारभारी ठरणार आहेत. ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी ९३२ ठिकाणी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात करून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुणे पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे १७४ मतदान केंद्रे प्रभाग क्र. ९ बाणेर - बालेवाडी-पाषाण येथे, तर प्रभाग क्र. ३९ अप्पर-सुप्पर इंदिरानगरमध्ये सर्वांत कमी म्हणजे ६८ मतदान केंद्रे आहेत. १४ हजार ८६० मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), तर ६ हजार ०४६ कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्रे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्रे प्रत्येकी दोन केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदार अधिकारी, १ शिपाई असणार आहेत.व्होटर स्लीपचे वाटप ८५ टक्के

सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ, आदी माहितीच्या व्होटर स्लीपचे पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून वितरण वाटप करण्यात येत आहे. व्होटर स्लीप वाटपाची प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू असून, आतापर्यंत ८५ टक्के वाटप पूर्ण झाले आहे.४५ रुग्णवाहिका सज्जमहापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रुग्णवाहिकेसह १५ वैद्यकीय पथके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयाकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.

...असे राेखणार दुबार मतदान

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे तब्बल ३ लाख ४४६ आहे. दुबार मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचेे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार इथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेत आहेत. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला जाणार आहे.

मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन नेता येणार नाही

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Election: Fate of candidates to be decided today.

Web Summary : Pune votes today to elect its municipal leaders. 1153 candidates are contesting 165 seats across 41 wards. High security at sensitive polling booths. Voter slip distribution reached 85%. Mobile phones banned inside polling stations.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र