शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: मानकरांचा २६ हजार मतांचा विक्रम; राज्यात सर्वाधिक मताधिक्याची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:41 IST

मानकर यांना मिळालेले हे मताधिक्य राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक ठरले आहे.

- हिरा सरवदेपुणे : महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक २६ हजार ४९७ मताधिक्य भाजपचे प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांना मिळाले आहे. तर सर्वात कमी म्हणजे केवळ ५५ मतांनी भाजपचेच प्रभाग १७ मधील उमेदवार खंडू लोंढे हे विजयी झाले आहेत. मानकर यांना मिळालेले हे मताधिक्य राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक ठरले आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याने भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे १२० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलेला भाजप पक्ष ८० ते ९० जागा जिंकेल, तर दोन राष्ट्रवादी मिळून ५० ते ६० जागा जिंकतील असा अंदाज अनेक अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने ठेवलेले उद्दिष्ट गाठत दोन्ही राष्ट्रवादींना आसमान दाखवल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजपचे ११० उमेदवार विजयी झाले. तर दोन्ही राष्ट्रवादींना केवळ ३० जागांवर समाधान मानावे लागले.

विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य जास्त तर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी आहे. भाजपचे प्रभाग क्र. २५ मधील उमेदवार राघवेंद्र मानकर यांनी ७९.३४ टक्के मते घेत उद्धवसेनेचे समीर गायकवाड यांचा तब्बल २६ हजार ४९७ मतांनी पराभव केला आहे. त्या खालोखाल प्रभाग ४ मधील भाजपच्या उमेदवार रत्नमाला सातव यांना दोन नंबरचे मताधिक्य असून त्यांनी राष्ट्रवादीच्या वसुंधरा उबाळे यांचा २३ हजार १३६ मतांनी पराभव केला आहे. तसेच तीन नंबरचे मताधिक्य माजी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना असून त्यांनी राष्ट्रवादीच्या अॅड. राधिका कुलकर्णी यांचा २२ हजार ६८१ मतांनी पराभव केला आहे.

याशिवाय सर्वात कमी मताने विजयी होण्याचा मानही भाजप उमेदवारालाच मिळाला आहे. प्रभाग १७ मधील भाजप उमेदवार खंडू लोंढे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या केवळ ५५ मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर दोन नंबरचे कमी मताधिक्य प्रभाग २२ मधील भाजप उमेदवार विवेक यादव यांचे असून त्यांनी काँग्रेसचे अविनाश बागवे यांचा ६२ मतांनी पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रभाग २ मधील उमेदवार रवी ऊर्फ हर्षल टिंगरे यांनी भाजप उमेदवार सुधीर वाघमोडे यांचा १३८ मतांनी पराभव केला आहे.

-------------------

सर्वाधिक मतांनी विजय झालेले उमेदवार

१) राघवेंद्र (बाप्पू) मानकर (भाजप) - २६ हजार ४९७

२) रत्नमाला सातव (भाजप) - २३ हजार १३६

३) स्वरदा बापट (भाजप) - २२ हजार ६८१

-------------

सर्वात कमी मतदानांनी विजयी झालेले उमेदवार

१) खंडू लोंढे (भाजप) - ५५

२) विवेक यादव (भाजप) - ६२

३) रवी ऊर्फ हर्षल टिंगरे (राष्ट्रवादी) - १३८

--------------------

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Pune Election: Mankars' Record Win, Lowest Margin Also BJP

Web Summary : BJP swept Pune's PMC election; Raghavendra Mankars won by 26,497 votes, a state record. BJP secured 110 seats, overshadowing NCP. The lowest victory margin was also a BJP candidate, Khandu Londhe, by 55 votes.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Puneपुणे