शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:38 IST

PMC Election 2026 निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो, बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात उमेदवार सोसायटया आणि घरांना भेटी देत आहेत. तसेच त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत?  कोणत्या समस्या आहेत? काही अडचणी आहेत का? याबाबत ते जाणून घेत आहेत. तसेच आम्हाला निवडून दिल्यास समस्या सोडवण्याची आश्वासने उमेदवारांकडून दिली जात आहेत. अशातच पुण्यातील बाणेरबालेवाडी परिसरातून नागरिकांची लक्षवेधी भूमिका समोर आली आहे.    

बालेवाडी येथील ‘साई सिलिकॉन व्हॅली’ सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’ असे बॅनर लावून रहिवाशांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. या बॅनरमुळे संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो. बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे. तुम्हाला मत हवे असेल दारूचे दुकान हटवा अशी या नागरिकांची मागणी आहे. 

महापालिका निवडणूक तब्बल ८ वर्षांनी होती आहे. इतके वर्ष नगरसेवक नसल्याने लोकांना समस्या घेऊन कुठेही जाता येत नव्हते. आता नागरिकांना एका प्रभागाला ४ नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही आपल्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बरेच नागरिक आतापासूनच उमेदवारांसमोर आपल्या भूमिका मांडताना दिसून येत आहेत. त्यामध्ये आता सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘साई सिलिकॉन व्हॅली’ सोसायटीबाहेर लावलेले हे बॅनर सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहे. त्यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी या बॅनरबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या बॅनरबाबत प्रशासन काही विचार करेल का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Residents Demand Wine Shop Removal for Votes in PMC Election

Web Summary : Pune residents in Balewadi demand the removal of a wine shop, displaying banners stating, "Our vote to whoever removes the wine shop." Frustrated by years without local councilors, citizens are now voicing their concerns directly to candidates before the upcoming PMC election.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BanerबाणेरBalewadiबालेवाडीSocial Viralसोशल व्हायरलVotingमतदान