पुणे : मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती शहर निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत. अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
ही आहेत ती १२ ओळखपत्रे
पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, आधारकार्ड, सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित अपंगत्वाचा दाखला, राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस खातेदाराचे फोटो असणारे पासबुक, मनरेगाअंतर्गत देण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.
Web Summary : Pune voters can use 12 alternative photo IDs, including passport, driver's license, or Aadhaar, if they lack a voter ID, stated election officer Ram.
Web Summary : पुणे के मतदाता वोटर आईडी न होने पर पासपोर्ट, ड्राइविंग लाइसेंस या आधार सहित 12 वैकल्पिक फोटो आईडी का उपयोग कर सकते हैं, चुनाव अधिकारी राम ने बताया।