शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात बस, मेट्रो फुकट देताय; श्वास घ्यायला जागा द्या, सुबोध भावेंची प्रशासनावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:00 IST

PMC Election 2026 नागरिकांचा 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत. नवीन कन्स्ट्रक्शनमुळे अनेक समस्या वाढल्या आहेत.

पुणे : पुण्यात अभिनेते सुबोध भावे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी मतदान करत रहा हा राष्ट्रीय हक्क असून तो बजावायलाच पाहिजे असे आवाहन माध्यमांशी बोलताना केले आहे. तसेच बस फुकट देताय, मेट्रो फुकट देताय यापेक्षा श्वास घ्यायला जागा द्या ती महत्वाच असल्याचं म्हणत प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. 

भावे म्हणाले,  नागरिक विकासात नसतील तर विकास हा अंगावरच येणार आहे. फुकट द्यायचा असेल तर ग्राउंड द्या बाकी काही देऊ नका. शहरातील प्रत्येक माणसाचा चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. नागरिकांचे जीवन सुसह्य करणं हे पहिलं काम आहे. बस फुकट देताय ,की मेट्रो फुकट देता यापेक्षा श्वास घ्यायला जागा द्या ती महत्वाच आहे. घटनेने मूलभूत अधिकार दिला आहे. मतदान करण्याचा तो आपण पाळला पाहिजे. आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आपलं कर्तव्य बजावून आपण बाहेर बसतो हे योग्य नाही. ज्या उमेदवारांना आपण निवडून देतो त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. उमेदवार काम करतात की नाही हे बघणं सुद्धा नागरिकांचे काम आहे.  नागरिकांचा दबाव राजकारणींवर नसेल तर लोकांविरुद्ध तक्रारी करून काही उपयोग नाही. नागरिकांचा दबाव पुण्यात, राज्यात कुठेही दिसत नाही. पुण्याचे बदललेले स्वरूप मुंबईपेक्षा भयंकर होत चालले आहे. नगरसेवकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य आहे. असं म्हटलं तर आपल्याला मतदान करण्याचा काहीही अधिकार नाही.

 

आपल्याला दिलेले आश्वासनं नगरसेवकांनी पूर्ण करण्याचा अधिकार आहे. नागरिकांचा 3 मजली इमारतीच्या जागी 27 मजली इमारती झाल्या म्हणून विकास नाही होत. नवीन कन्स्ट्रक्शन वाढलं यामुळे अनेक समस्या वाढल्या आहेत. विकास हा शहराचा गळा घोटून करायचा नसतो. मुलांना खेळायला ग्राउंड नाहीत जेष्ठ नागरिकांना फिरायला जागा नाहीत. आता मिळेल त्या जागेत फक्त बिल्डिंग उभा केल्या जातात. विकास हा माणसं जगण्यासाठी आणि जागवण्यासाठी असला पाहिजे. आता अपेक्षा केव्हाच संपल्या आहेत. मतदानापुरतं नागरिकांनी मर्यादित न राहता नागरिक एकत्र आले तर काही होऊ शकेल. मतदानाला लोक चांगली बाहेर पडलेत नागरिकांचा या सिस्टीम वरती असलेला विश्वास उडालेला नाही. आता लोकप्रतिनिधी सोबत आपल्यालाही काम करावे लागेल. मला अठरा वर्षे झाल्यानंतर मी एकही मतदानाचा हक्क बजावायचा सोडला नाही. त्यामुळे मतदान करत रहा राष्ट्रीय हक्क आहे मूलभूत हक्क आहे तो बजावायलाच पाहिजे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Subodh Bhave criticizes Pune administration, emphasizing need for open spaces.

Web Summary : Actor Subodh Bhave urged Pune's administration to prioritize open spaces over free bus/metro services. He emphasized citizen involvement in development, criticizing unchecked construction and its impact on quality of life. Bhave stressed the importance of voting and holding elected officials accountable.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Subodh Bhaveसुबोध भावे VotingमतदानAjit Pawarअजित पवार