शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, आज निकालाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 08:51 IST

पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) शहरातील १५ ठिकाणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतमोजणी सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांमध्ये होणार असून सर्वांत कमी १२ फेऱ्या बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागांच्या होणार आहेत. त्यामुळे पहिला निकाल साडेअकरापर्यंत येण्याची शक्यता असल्याने दुपारी दोनपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. या निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी होणार आहे. निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत.

प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वात कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे या प्रभागाच्या निकालाला विलंब होऊ शकतो.

 पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेटक्षेत्रीय कार्यालयनिहाय दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर-सुपर इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक येवलेवाडी मध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत, तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वांत कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होऊन या प्रभागांचा निकाल सर्वांत लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. तर साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल. 

मतमोजणी होणार या १५ ठिकाणी :

सारसबागेशेजारील, कै. बाबूराव सणस क्रीडांगण, वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ए लर्निंग स्कूल, टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेड, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदान, कात्रजमधील गोकुळनगर हेमी पार्कजवळील छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, वानवडीतील जिजाऊ मंगल कार्यालय, हडपसरमधील माळवाडी येथील साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृह, खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिटंन हॉल, कोथरूडमधील एमआयटीमधील द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, भवानी पेठेतील रफी अहमद किदवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय, पौडफाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी शाळा, कोरेगाव पार्कमधील मौलाना अब्दुल कलाम स्मारक, नगररोड-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Corporation Election 2026: Counting Ready, Results Awaited Today

Web Summary : Pune awaits PMC election results today, counting at 15 locations from 10 AM. Twenty rounds are scheduled for Dhankawadi, while Bibwewadi will have twelve. The complete picture is expected by 2 PM.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६PuneपुणेElectionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग