शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026 : येत्या तीन महिन्यांत २,५०० बस पुणेकरांच्या सेवेत;१०० नवे मार्ग,डबल डेकरही धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:23 IST

रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून येत्या एप्रिल-मेपर्यंत अडीच हजार नव्या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि. ९) येथे दिली. यापूर्वी कधी नव्हे इतक्या जलदगतीने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार केला जात आहे. यामुळे चार हजार बसगाड्यांचा ताफा पुणेकरांसाठी सज्ज होईल. यातून रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार मोहोळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, “अतिरिक्त बसगाड्यांमुळे सध्याच्या ३९४ मार्गांमध्ये, किमान १०० नव्या मार्गांची भर पडणार आहे. याचा फायदा उपनगरांमधील दुर्लक्षित भाग व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील पुणेकर नागरिकांना होणार आहे.”

पुण्यातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपाने भर दिला आहे. मेट्रोचे विस्तारीकरण आणि पर्यावरणपूरक बसगाड्यांची संख्या वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे, असे खासदार मोहोळ यांनी सांगितले. पुण्यासाठी केंद्राने १,००० इलेक्ट्रिक आणि १,००० सीएनजी बस नुकत्याच जाहीर केल्या आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बसचा ताफा वाढल्यानंतर ‘पीएमपीएमएल’ची १८१ एकर जागा विकसित केली जाईल, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली. 

प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफा डिझेलमुक्त बसगाड्यांचा केला जात आहे. याचाच भाग म्हणून २५ इलेक्ट्रिक डबल-डेकर गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये डबल डेकरची १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेतली गेली. हा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे लवकरच हिंजवडी फेज ३, रामवाडी मेट्रो स्थानक-खराडी, मगरपट्टा सिटी-कल्याणी नगर मेट्रो, पुणे रेल्वे स्थानक-लोहगाव विमानतळ, देहू-आळंदी, चिंचवड-हिंजवडी आदी मार्गांवर डबल-डेकर बस धावताना दिसेल.  - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune to Add 2,500 Buses, 100 New Routes Soon

Web Summary : Pune will add 2,500 buses by April-May, including electric double-deckers, announces Minister Mohol. 100 new routes will connect suburbs and newly included villages. The expansion aims to serve 1.8-2 million passengers daily, focusing on eco-friendly public transport and reducing congestion.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाElectionनिवडणूक 2026murlidhar moholमुरलीधर मोहोळ