शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या निलंबित २९ कर्मचाऱ्यांना ‘माफी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 07:18 IST

बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला

पुणे : बेशिस्त वर्तन, निष्काळजीपणा, गैरहजेरी अशा विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आलेल्या २९ कर्मचाºयांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. पूर्वीचे चांगले वर्तन लक्षात घेऊन तसेच सध्याची कर्मचाºयांची गरज पाहून या कर्मचाºयांना निलंबनातून माफी मिळाली आहे.‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दोन अधिकाºयांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात नुसतेच वेतन देण्यापेक्षा त्यांचे निलंबन रद्द केल्यास कामकाज होईल, असा दावा करीत प्रशासनाने त्यांचे निलंबन रद्द केले. हाच नियम आता इतर कर्मचाºयांनाही लागू करण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचाºयांचे विविध कारणांसाठी निलंबन करण्यात आले. त्यामध्ये अपघात, बेशिस्त वर्तन, गैरहजेरी, उद्धट वर्तन, निष्काळजीपणा, कामचुकारपणा, तिकीट रकमेत तफावत अशा विविध कारणांचा समावेश आहे.पीएमपीकडे ६२ कर्मचाºयांच्या निलंबनाची प्रकरणे होती. चौकशी विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच या विभागात चौकशीची इतरही अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने कर्मचाºयांच्या विविध प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी प्रशासनाने नुकतीच सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. ही कामे मार्गी लावण्याबरोबरच समितीकडे निलंबित कर्मचाºयांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतही काम देण्यात आले आहे.समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये एकूण निलंबित कर्मचारी व त्यांचे यापूर्वीचे वर्तन यावर चर्चा करून ३१ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या कर्मचाºयांवरील आरोप किरकोळ स्वरूपाचे असल्याने त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. परंतु त्यांची सेवेत आल्यानंतरही चौकशी सुरूच राहणार आहे.समितीने २९ कर्मचाºयांचे निलंबन रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. या कर्मचाºयांवर किरकोळ स्वरूपाचे आरोप आहेत. लवकरच त्यांचे निलंबन रद्दचे आदेश काढले जातील. - सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी