शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यवसायाच्या वादातून खुनाचे कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:56 IST

दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे.

यवत : दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खूनाचे कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात लावलेल्या कलमांमध्ये कट रचण्याचे कलम वाढविले असून यात आणखी एक आरोपी वाढला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

स्वप्नील उर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय - ३०) याचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी यवत पोलिसांनी काही तासातच तपासाची जोरदार चक्रे फिरवत सोमनाथ विष्णू शेलार, विशाल उर्फ बाबू मेमाणे , रणजित उर्फ बाबू वांझरे , बबलू विश्वास डेंगळे व अनिल उर्फ सुनील शितोळे यांना अटक केली होती. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू व्यावसायच्या वादातून यापूर्वी राहू येथे दुहेरी खून घडला होता. दिवसा ढवळ्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपी संतोष संपत जगताप व समीर संपत जगताप यांचा देलवडी येथे युवकाच्या खुनात सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद होते. ते दोघे अजूनही फरार आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहे.या सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी काही तासातच खुनाचा तपास लावून पाच आरोपींना अटक केली होती. तर फिर्यार्दी नमूद केलेले आरोपी असलेले चौघे आरोपी फरारी झाले होते.

टॅग्स :sandवाळूCrimeगुन्हाPuneपुणे