हेल्मेट वापराचा प्रेमळ आग्रह

By Admin | Updated: November 11, 2014 00:21 IST2014-11-11T00:21:01+5:302014-11-11T00:21:01+5:30

हेल्मेट वापरणो वाहनचालकांच्याच हिताचे आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठीच पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत आग्रह धरला जात आहे.

Pleasant insinuation of helmet use | हेल्मेट वापराचा प्रेमळ आग्रह

हेल्मेट वापराचा प्रेमळ आग्रह

पुणो : हेल्मेट वापरणो वाहनचालकांच्याच हिताचे आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठीच पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत आग्रह धरला जात आहे. मोटारसायकल चालकांनी हेल्मेट घालणो हा कायदा असून, त्याचे पालन करणो प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली हेल्मेटची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली.
वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून शहरात विविध मोहिमांसोबत हेल्मेट न घालणा:या वाहनचालकांविरुद्धही मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासूनच बाह्या सारून ही मोहीम सुरू केल्यानंतर दुचाकी चालकांमधून ओरड सुरू झाली आहे. अनेक जण या कारवाईमुळे असमाधानी आहेत; परंतु केवळ हेल्मेटच नाही तर वाहतूक पोलिसांकडून ट्रिपलसीट, ङोब्रा क्रॉसिंगचीही कारवाई करण्यात येत आहे. परंतु, केवळ हेल्मेट कारवाईलाच वाहनचालक आक्षेप घेत आहेत. त्यामुळे कायमच वादाचा ठरलेला हा विषय पुन्हा वादाला जन्म देणार आहे.
गेल्या 4 दिवसांत वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणा:या तब्बल 13 हजार 688 वाहनचालकांकडून दंड वसूल केला आहे. या कारवाईदरम्यान वाहनचालक व पोलिसांमध्ये खटकेही उडाले. दुचाकीचालकांनी हेल्मेट घालायलाच पाहिजे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. दुचाकीचालकांच्या गेल्या काही महिन्यांत झालेल्या 71 प्राणांतिक अपघातांमध्ये 5क् दुचाकीचालकांना हेल्मेट न घातल्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. आपल्या मुलांनी हेल्मेट घालावे, याकरिता पालकांनी आग्रह धरणो जरुरीचे आहे. पुणो पोलिसांकडून वारंवार वाहतूक 
जागृती आणि हेल्मेट वापरासंबंधी जगजागृती केली जात असल्याचे माथूर म्हणाले. (प्रतिनिधी)
 
4जानेवारीपासून ते आजतागायत वाहतूक पोलिसांनी     6 लाख 84 हजार 612 वाहनचालकांवर विविध कारवाया केल्या आहेत. 
4यामधून पोलिसांनी 7 कोटी 67 लाख 
16 हजार 25क् रुपयांचा दंड वसूल                      केला आहे. 
4यामध्ये 48 हजार 382 नो एंट्री कारवाया, 1 लाख 24 हजार 995 सिग्नल तोडणो, 23 हजार 912 फॅन्सी नंबर प्लेट, 7क् हजार 989 सीट बेल्ट, 29 हजार 982 ज्ॉमर कारवाया, 22 हजार 14क् हेल्मेट आणि 11 हजार 364 जणांविरुद्ध ट्रिपलसीटची कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
 
वारहेल्मेट ङोब्रा क्रॉसिंग
शुक्रवार4,6161,464
शनिवार3,9311,218
रविवार2,6क्क्1,7क्क्
सोमवार2,6869क्क्

 

Web Title: Pleasant insinuation of helmet use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.