शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
4
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
5
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
7
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
8
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
9
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
10
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
11
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
12
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
13
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
14
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
15
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
16
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
17
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
18
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
19
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
20
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले

चार प्रेक्षकांसाठीचं नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 7:08 PM

पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात.

पुणे : तुम्ही एखादं नाटक पाहायला गेलात अाणि तेथे स्टेज नसेल, तुम्हाला बसायला खुर्ची नसेल तुमच्या साेबत फक्त तीनच लाेक नाटक बघायला अाले असतील तर...तुम्ही म्हणाल असं कुठे नाटक असतं का...? तर याचं उत्तर अाहे हाे...पुण्यातील एका बंगल्यात एकावेळी केवळ चार प्रेक्षकांसाठी नाटक सादर केले जाते. नेहमीचा नाटकाचा थिअटरचा परीघ माेडून कुठल्याही ठिकाणी नाटक सादर केलं जाऊ शकतं, तसेच त्या नाटकात प्रेक्षकांनाही सामावून घेतलं जाऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न यातून केला जात अाहे. या प्रकारे नाटक सादर करण्याच्या माध्यमाला थिअटर फ्लेमिंगाे असे म्हंटले जात असून हे माध्यम जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पाेहचविण्यासाठी पुण्यातील तरुण सध्या प्रयत्न करीत अाहेत. 

   पुण्यातील विनय काेरवणकर व त्याचे मित्र थिअटर फ्लेमिंगाे हा नाट्यप्रकार प्रेक्षकांसाठी घेऊन अाले अाहेत. ललित कला केंद्रातून शिक्षण घेतलेल्या विनय काेरवणकर याला वेगळं नाटक करायचं हाेतं. थिअटरचं प्राेसिनियम ताेडून बाहेर नाटक त्याला करुन पाहायचं हाेतं. सुरुवातीला त्याने अाेझं हे एकपात्री नाटक घराेघरी सादर केलं. त्यानंतर थिअटर फ्लेमिंगाे या नाट्यप्रकारात नाटक सादर करण्याचा त्याने विचार केला. या नाट्यप्रकाराच्या माध्यमातून अाता ताे एका बंगल्यात केवळ चार प्रेक्षकांसाठी रिड मी 5 डी झाेन हे नाटक सादर करत अाहे. 5 डी ही या नाटकाची संकल्पना अाहे. हे नाटक एका बंगल्याच्या विविध भागात सादर केलं जातं. यात प्रेक्षकांना बसण्याची अशी कुठलिही व्यवस्था नाही. नाटकातील पात्र बंगल्याच्या विविध भागांमध्ये नाटक सादर करतात. प्रेक्षक जसजसे बंगल्याच्या विविध ठिकाणी जातात त्याप्रमाणे नाटक पुढे सरकते. या माध्यमातून प्रेक्षकही त्या पात्रांशी एकरुप हाेताे अाणि एक वास्तववादी अनुभव प्रेक्षकांना यातून मिळताे. यात फक्त प्रेक्षक कलाकाराशी बाेलू शकणार नाहीत किंवा त्यांना हातही लावू शकणार नाहीत. एकवेगळा अनुभव यातून प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला जात अाहे. 

    एेंशी मिनिटाच्या या नाटकात गे, बायसेक्श्यूल या मुद्दांवर प्रकाश टाकण्यात अाला अाहे. याबाबत बाेलताना या नाटकातील कलाकार अक्षयकुमार मांडे म्हणाला, प्रेक्षकांची संख्या वाढली तर या नाटकाचा प्रेक्षकांवरचा परीणाम कमी हाेऊ शकताे, सध्या ज्या बंगल्यात अाम्ही हे नाटक सादर करताे त्याचा विचार करता केवळ चार ते सहा प्रेक्षकांनाच एकावेळी हे नाटक पाहता येऊ शकते. परंतु पुढे हा अाकडा वाढविण्याचा अामचा विचार अाहे. नाट्यगृहात सादर केलं जाणारं नाटक अाणि या माध्यमात सादर केलं जाणारं नाटक यात फरक अाहे. येथे कलाकारांना वास्तववादी अभिनय करावा लागताे. प्रेक्षक हेही अामच्यासाठी एक नाटकातील पात्रच असतात. एक अभिनेता म्हणून मला खूप वेगळा अनुभव या पद्धतीचं नाटक करताना येत अाहे. प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रीया सध्या अाम्हाला मिळत अाहेत. 

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकnewsबातम्याGay Marriageसमलिंगी विवाहartकला