पुणे स्थानकावरील प्लॅॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:55+5:302021-09-19T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणेकरांना आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना स्थानकावर सोडायला जाणे आता स्वस्त झाले आहे. कारण प्लॅॅटफॉर्म ...

पुणे स्थानकावरील प्लॅॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपयांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणेकरांना आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना स्थानकावर सोडायला जाणे आता स्वस्त झाले आहे. कारण प्लॅॅटफॉर्म तिकीटचे दर आता १० रुपये झाले आहे. पूर्वी हे दर प्रतिव्यक्तीसाठी ५० रुपये होते. तिकीट दर कमी झाल्याने पुणे स्थानकावरील प्लॅॅटफॉर्म तिकीट विक्रीत वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला ३ हजार तिकिटांची विक्री होत होती. ती आता ४ हजारांवर गेली आहे. त्यामुळे आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) च्या उत्पन्नात वाढ होत आहे.
पुणे स्थानकावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या हंगामात ही संख्या लाख ते दीड लाख इतकी होते. नातेवाईकांना स्थानकांवर सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील महिन्यात रोज सरासरी तीन हजार प्रवासी प्लॅॅटफॉर्म तिकीट काढून पुणे स्थानकांवर येत होते. त्यात आता वाढ झाली आहे. रोजचे आता उत्पन्न चाळीस हजार होत आहे.
बॉक्स १
दीड वर्ष ५० रुपये होते तिकीट दर :
कोविडच्या पहिल्या लाटेपासून रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावरचे प्लॅॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये आकारले होते. तसेच, ते सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. जर कुणी दिव्यांग अथवा ज्येष्ठ नागरिकांना सोडायला आला असेल, तरच त्यांना प्लॅॅटफॉर्म तिकीट दिले जाते. त्यामुळे त्यावेळी प्लॅॅटफॉर्म तिकीटची विक्री खूप कमी झाली होती. जुलै २१ पासून प्लॅॅटफॉर्म तिकीटचे दर पुन्हा १० रुपये करण्यात आले.
बॉक्स २
रोज सरासरी चार हजार प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री :
पुणे रेल्वे स्थानकावर सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सरासरी साडेतीन हजारहून अधिक प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होते. शनिवारी व रविवारी यात वाढ होते. या दोन दिवसांत तिकीट विक्री चार हजाराच्या घरात पोहोचते. यातून आयआरएसडीसीला (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) रोजचे सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
बॉक्स ३
ह्या गाड्या धावतात :
पुणे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या :
पुणे - मुंबई डेक्कन, डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे - दानापूर एक्स्प्रेस, पुणे - जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे - दानापूर एक्स्प्रेस. पुणे - वाराणसी ज्ञानगंगा एक्स्प्रेस, पुणे - जबलपूर एक्स्प्रेस, पुणे - जयपूर एक्स्प्रेस, पुणे - लखनऊ एक्स्प्रेस, पुणे - सतरंगाची, पुणे - नांदेड एक्स्प्रेस, राजकोट - सिकंदराबाद एक्स्प्रेस, यशवंतपूर - जयपूर, बंगळुरू - अजमेर, जोधपूर - बंगळुरू, गांधीधाम - बंगळुरू, अजमेर - म्हेसूर, मुंबई - नागरकोईल, आदी गाड्या धावत आहेत.