शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Plastic Ban : तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद, तुमची लाडकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 03:33 IST

‘‘आज मी काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत

पुणे : ‘‘आज मी काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत. पण आयुष्यात असे प्रसंग येतात की, आपल्याला एकमेकांपासून दूर जाणे भाग पडते. मला वाटत नाही मी परत येईन. भविष्यात कधी चुकून भेट झालीच तर मला जरूर ओळख दाखवा. आतापर्यंत तुम्ही जे मला प्रेमं दिलं त्याबद्दल धन्यवाद. तुमची लाडकी... प्लॅस्टिक पिशवी.’’कालपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजने प्लॅस्टिकबंदीबाबत नागरिकांना भलतेच जागृत केले आहे. तर विक्रेता, व्यापारी वर्गाला सावधानतेचे संकेत दिले आहेत. यासारख्या अनेक मेसेजेस, पोस्ट सोशल माध्यमांमध्ये लोकप्रिय होत असून प्लॅस्टिकबंदीचा प्रचार अन् प्रसार करमणुकीतून होताना पाहवयास मिळत आहे. हल्ली कुठलीही बंदी असो, सक्ती असो, नियमांची पायमल्ली असो किंवा आदेशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केलेली गळचेपी असो या सर्वांची खिल्ली उडविणाºया पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायचा टेÑंड भलताच लोकप्रिय होत आहे. मार्मिक शेरेबाजीने प्लॅस्टिकबंदीचे स्वागत आणि त्यावर नाराजी व्यक्त होत असून त्यासंबंधीचे विनोदी लेखन सोशल माध्यमांवर वाचायला मिळत आहे. दैनंदिन वस्तू आणण्यासाठी ज्या प्लॅस्टिक पिशवीचा आधार इतक्या वर्षांपासून सर्वसामान्य माणसाला होता आता तो इतक्या तातडीने गेल्याने नागरिकांना वस्तू कशात घ्यायच्या, न्यायच्या हा प्रश्न सतावत आहे. तसेच काहींनी शासनाच्या प्लॅस्टिकबंदी या भूमिकेचे स्वागत केले असून थोड्याच दिवसांत कागद आणि कापडाचे भाव कसे वाढतील, याकडे लक्ष वेधले आहे. प्लॅस्टिकबंदी केली खरी; मात्र त्यावरील उपाययोजना हव्या तितक्या प्रभावीपणे अमलात आणण्याकरिता काय करावे लागेल, याविषयी कुणीच काही सांगत नाही. काही खानपानाच्या वस्तू आणण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांची गरज असताना अशावेळी कापडी पिशव्या किंवा भांड्यांचा वापर करायचा का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. प्लॅस्टिकबंदीचे साधक-बाधक पद्धतीने स्वागत होत असताना ती प्रत्यक्षात कृतीत आणताना ज्या व्यापक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहेत ते होताना दिसत नसल्याची खंत तरुणांकडून सोशल माध्यमांद्वारे व्यक्त केली जात आहे. कपडे, भाजीपाला, क्रॉकरी, शोभेच्या वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू, सजावटीच्या सामानाची ने-आण करण्याकरिता काय वापरावे, असा प्रश्न विचारला जात असून बºयाच पोस्ट दैनंदिन व्यवहारात सातत्याने वापरल्या जाणाºया साधनांविषयक आहेत.अनेकांनी यावेळी देखील सरकारला नावे ठेवली असून त्यांच्या बंदीधोरणाविषयक नकारात्मकता व्यक्त केली आहे. बंदी आणताना पर्यायही द्यायला हवा होता. प्रत्यक्षात कारवाई करताना तो लगेचच होईल, ही अपेक्षा चुकीची आहे. अशा आशयाच्या पोस्टदेखील सोशल माध्यमांवर चर्चेत आहे. नागरिकांनी बंदीचे स्वागत केले असून नोटाबंदीप्रमाणे या बंदीला सामोरे जाताना काही थोडाफार त्रास सहन करावा लागेल. शेवटी ते सर्वांच्या फायद्याचेच आहे, असा सूर आळवला.