शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 17:53 IST

गुढीपाडव्यापासून राज्यात टप्याटप्याने प्लस्टिक बंदी करण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली. या निर्णयाचे पुणेकर नागरिक व विक्रेत्यांनी स्वागत केले असून कापडी पिशव्या वापरण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत अाहे.

ठळक मुद्देपुणेकरांनी केले प्लॅस्टिक बंदीचे स्वागतकापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृतीची गरज

पुणे : गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करणार करण्यात अाली. त्याबाबतची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली होती. या बंदीला पुणेकरांनी पाठींबा दिला असून सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. तर प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही अनेकांनी व्यक्त केली.     राज्य सरकारकडून प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. या पिशव्यांचा वापर केल्यास पहिल्या वेळेस पाच हजार दुसऱ्यावेळेस दहा तर तिसऱ्या वेळेस एखादी व्यक्ती या पिशव्यांचा वापर करताना आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.     सरकारच्या या निर्णयाबद्दल पुणेकर सकारात्मक असून प्लॅस्टिक पिशव्यांवरची बंदी योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु या पिशव्यांच्या व्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था सरकारने करायला हवी तसेच ग्राहकांमध्ये सुद्धा जनजागृती करण्याची मागणी काही भाजी विक्रेत्यांनी केली आहे. भाजी विक्रेते सचीन पडवळ म्हणाले, प्लॅस्टिक पिशव्यांच्या बंदीचा निर्णय योग्य आहे. उलट या निर्णयामुळे आमचाच फायदा आहे. कारण आम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या विकत घेण्याचा भुर्दंड पडणार नाही. परंतु ग्राहकांमध्ये याबाबत जागृती असणे गरजेचे आहे. अनेक ग्राहक अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आग्रह धरतात. असे न करता त्यांनी आपल्या सोबत कापडी पिशवी आणावी.     रेखा खांदवे म्हणाल्या, ज्या ठिकाणी या पिशव्या तयार केल्या जातात त्या कंपन्यांवरच बंदी घालाया हवी. त्या कंपन्या बंद केल्यातर प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळणार नाही. आमच्या सारख्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा सरकारने या पिशव्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.     मानसी पारेख या गृहिणी म्हणाल्या, सरकारने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करायला हवा. तसेच विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या सोबत काही कापडी पिशव्या ठेवाव्यात जेणेकरुन ग्राहक त्या विकत घेऊन भाजी किंवा वस्तू खरेदी करु शकतील. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPuneपुणेvegetableभाज्या