शहीद दिनानिमित्त प्लाझ्मा, रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:06 IST2021-03-30T04:06:33+5:302021-03-30T04:06:33+5:30

हडपसर गांधी चौक येथे रक्तदान आणि प्लाझमा दान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर ...

Plasma, blood donation camp on the occasion of Martyr's Day | शहीद दिनानिमित्त प्लाझ्मा, रक्तदान शिबिर

शहीद दिनानिमित्त प्लाझ्मा, रक्तदान शिबिर

हडपसर गांधी चौक येथे रक्तदान आणि प्लाझमा दान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर नीलेश मगर, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, हेमलता मगर, माजी नगरसेवक सुनील बनकर, माजी स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, डॉ. शंतनू जगदाळे, नितीन होले, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, सतीश जगताप, योगेश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हडपसरमधील शहीद भगतसिंग जीवरक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बच्चुसिंग टाक म्हणाले की, मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे रक्त आणि प्लाझमाचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याने रक्तदान व प्लाझमा दान शिबिराचे आयोजन केले होते. दिवसात सुमारे 650 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Web Title: Plasma, blood donation camp on the occasion of Martyr's Day