शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अस्थी विसर्जन न करता शेतातच ठेवून केले वृक्षारोपण; जुन्नर तालुक्यातील आदर्श उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 12:31 IST

आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प..

ठळक मुद्देकुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी घेतला पुढाकार

पुणे : मृत्यू झाल्यानंतर नदीत अस्थिविसर्जन केले जाते. परंतु एका कुटुंबाने नदीत अस्थिविसर्जन न करता स्वत:च्या शेतातच जमिनीत ठेवून त्यावर वृक्षारोपण केले आहे. आईच्या नावाने हे रोप वाढविण्याचा आणि निसर्ग संवर्धन करण्याचा संकल्प या कुटुंबाने केला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या गावातील थोरात कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे.

सध्या कोरोनाने पालखी पायी सोहळा रद्द झाला आहे. उलट घरोघरी रोप लावून यंदाची वारी हरित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन थोरात कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. नकुबाई वामनराव थोरात यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील नंदाशेठ, विजय या मुलांनी आणि शोभा सविता थोरात या सूनांनी नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबात वारीची परंपरा जपलेली असल्याने सर्वांनी वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतला.पालखी सोहळ्यात  पर्यावरण  वारीची परंपरा सुरू करणारे ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांनी यंदा गुळवेल लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार आईच्या स्मरणार्थ आंब्याचे झाड लावले असून, गुळवेल, पिंपळ, पेरू, जांभळी, लिंबू, सीताफळ ही रोपं देखील लावली आहेत. ही सर्व झाडं औषधी आहेत. झाड लावताना निसर्ग संरक्षणाचा पाठ वाबळे महाराज यांनी म्हटला.=====================निसर्गपाठ बोलून वृक्षारोपण''रूप पाहता लोचनी, पर्यावरण ठेवू मनीत्वा विठ्ठल बरवा, झाडे लावा झाडे जगवाबहुत सुकृताची जोडी, धरा सेंद्रीय खताची आवडीसर्व सुखाचे आगर, बनवू आमराई सुंदर !''हा निसर्गपाठ या प्रसंगी म्हणण्यात आला आणि वृक्षारोपण करण्यात आले.  ===============स्मृती जपण्यासाठी उपक्रमनदीत अस्थिविसर्जन केल्यानंतर प्रदूषण होते. पण या उपक्रमाने एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करणे मनाला दिलासा देणारे आहे. कारण रोप जसे वाढेल तसे त्या सळसळणाºया पानांतून ती व्यक्तीच आपल्याशी संवाद साधतेय अशी भावना मनी येईल. हा आनंद अविस्मरणीय ठरेल. पिढ्यान पिढ्या हा वृक्ष त्या व्यक्तीची आठवण म्हणून बहरत जाईल. ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे प्रबोधनकार ज्ञानेश्वरमहाराज वाबळे यांनी सांगितले.==============

टॅग्स :Junnarजुन्नरenvironmentपर्यावरणDeathमृत्यूPandharpur Wariपंढरपूर वारी