एआरएआय टेकडीवर १०१ वृक्षांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:33 IST2021-02-20T04:33:24+5:302021-02-20T04:33:24+5:30
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एआरएआय’च्या टेकडीवर १०१ वृक्ष लावण्याची मोहीम राबविण्यात ...

एआरएआय टेकडीवर १०१ वृक्षांचे रोपण
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘एआरएआय’च्या टेकडीवर १०१ वृक्ष लावण्याची मोहीम राबविण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला झाडे लावू या, ती जगवू या! या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या !', असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी तरुणांना केले होते. या आवाहनानुसार हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक व चित्रपट सेनेचे अध्यक्ष गिरीश परदेशी तसेच ‘राष्ट्रवादी’चे सनी मानकर, शुभम माताळे, संकेत शिंदे, अमोल गायकवाड, रवी गाडे, आकाश नागरे, सूरज आढाव आदी उपस्थित होते.