खडकी शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

By Admin | Updated: June 19, 2014 05:29 IST2014-06-19T05:29:13+5:302014-06-19T05:29:13+5:30

खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने संबंधित मान्यवरांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Plantation in Khadki Education Institute | खडकी शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

खडकी शिक्षण संस्थेत वृक्षारोपण

पिंपरी : खडकी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने संबंधित मान्यवरांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्थेच्या विविध शाखांमध्ये अध्यापन तसेच प्रशासक मंडळात कार्य केलेले कै. प्रदीप गुप्ता, कै. अनिल जाधव, कै. शिरीषभाई वाडीलाल शहा, कै. प्रा. अरुण रूपटक्के, कै. हनुमंत सोनवणे, सेवक कै. प्रणित बहिरट यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
संचालक आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी जे अनमोल योगदान दिले त्यांचे स्मरण रहावे आणि पुढच्या पिढीला त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची जाणीव व्हावी म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे, असे संस्थेचे सभासद अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव यांनी सांगितले.
झाडे जगली तर मानव जगेल हा विचार घेऊन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, चिटणीस अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड व संचालकांनी शताब्दी वर्षात हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.
कै. अनिल जाधव यांचे बंधू अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहन जैन, अनिल मेहता, रमेश आवस्थे, अपर्णा पाळंदे, रंजना कनकधर उपस्थित होते. आयोजन संचालक राजेंद्र भुतडा, मोहन जैन, उपप्राचार्य विजय मानकर यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. प्रकाश अंकुश यांनी केले. उपप्राचार्य विजय मानकर यांनी प्रास्ताविक केले. भुतडा यांनी स्वागत केले. पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल रणशूर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Plantation in Khadki Education Institute