चांडोली, वेताळे येथे वृक्षोरोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST2021-07-16T04:08:37+5:302021-07-16T04:08:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर: ग्रामपंचायत चांडोली व वेताळे (ता. खेड)आणि १४ ट्री या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. ...

Plantation at Chandoli, Vetale | चांडोली, वेताळे येथे वृक्षोरोपण

चांडोली, वेताळे येथे वृक्षोरोपण

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर: ग्रामपंचायत चांडोली व वेताळे (ता. खेड)आणि १४ ट्री या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. या संस्थेने १ हजार झाडे दोन्ही गावांना दिली आहेत. ३ वर्षे या झाडांचे संगोपन करण्यात येणार आहे.

चांडोली ते वडगाव शीव रस्ताच्या कडेने दोन्ही बाजूला ही झाडे लावण्यात आली आहे. आंबा, चिंच फणस, बिब्बा, जाभूळ, कडीपत्ता, निंबू, कडूनिंब, रिठ, बेहडा, मोह, सीताफळ, रामफळ, देवसावर, काटेसावर, उंबर, वड, पिंपळ, पेरू, बांबु, हिरडा या झाडांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला आनंद तायडे, सरपंच सुनीता सावंत, उपसरपंच दत्तू वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सतीश सावंत, रुपेश ताये, सचिन वाघमारे, आरती डोळस, स्वाती वाघमारे, प्रिया पवळे, दिगंबर सावंत, सचिन सावंत, चेतन सावंत, किशोर डोळस, नीलेश वाघमारे, नवनाथ पवळे, ग्रामसेवक आढाव, वामन बाजारे आदी उपस्थित होते.

फोटो : चांडोली (ता. खेड) येथे वृक्षारोपण करताना ग्रामपंचायत पदाधिकारी.

Web Title: Plantation at Chandoli, Vetale