अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण

By Admin | Updated: May 9, 2017 03:32 IST2017-05-09T03:32:04+5:302017-05-09T03:32:04+5:30

खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून आज साजरा करण्यात आला. अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

Plantation in Avasi Ghat Forest Park | अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण

अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून आज साजरा करण्यात आला. अवसरी घाट वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यंची रीघ लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल श्रीनिवास पाटील, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सर्व स्तरांतील नागरिकांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
शिवउद्योग सहकार सेना आणि स्वदेश सोशल हेल्थ फाउंडेशन यांच्या वतीने मोफत शिव आरोग्य चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा व नाममात्र दरात चष्मावाटप शिबिर श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या लांडेवाडी शाखेत पार पडले. न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथे खासदार आढळराव-पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली.
आढळराव-पाटील यांनी लांडेवाडी येथील निवासस्थानी थांबून शुभेच्छांचा स्वीकार केला. उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, सागर काजळे, शिवाजी राजगुरू, कल्पनाताई आढळराव-पाटील, अक्षय आढळराव-पाटील, खंडेराव आढळराव-पाटील, योगेश बाणखेले, अशोक बाजारे, राम तोडकर, अभिमन्यू लांडगे, अशोक गव्हाणे, देविदास दरेकर, शीतल तोडकर, भाऊसाहेब सावंत, विलास घेवडे उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Plantation in Avasi Ghat Forest Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.