योजना पालिकेची, प्रसिद्धी नगरसेवकांची
By Admin | Updated: February 2, 2015 02:18 IST2015-02-02T02:18:57+5:302015-02-02T02:18:57+5:30
श्रेय लुटण्याचे राजकारणी तरबेज असतातच, कोणत्याही गोष्टीचे श्रेय लुटणार नाहीत, ते राजकारणी कसले? श्रेयवादाचे उत्तम उदाहरण म्हणजे शहरात

योजना पालिकेची, प्रसिद्धी नगरसेवकांची
पिंपरी : श्रेय लुटण्याचे राजकारणी तरबेज असतातच, कोणत्याही गोष्टीचे श्रेय लुटणार नाहीत, ते राजकारणी कसले? श्रेयवादाचे
उत्तम उदाहरण म्हणजे शहरात
वॉर्डा-वॉर्डात सध्या सुरू असणारे डस्ट बीन वाटपाचे सोहळे होत. महापालिकेच्या योजनेवर नगरसेवक आपली ‘प्रसिद्धी’ची हौस पुरवून घेत आहेत. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण योजनेच्या (जेएनएनयुआरएम)अंतर्गत मुलभूत सुविधांपैकी एक असणाऱ्या कचरा व्यवस्थापन, यंत्रणेचे सक्षमीकरण करणे अनिवार्य आहे. त्याअंतर्गत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून त्यांची व्यविस्थत विल्हेवाट लावता यावी. त्यातून शहर स्वच्छ ठेवण्याचा उद्देश साध्य करण्यासाठी कचरा टाकण्यासाठी दोन डस्टबीन वाटपाचे नियोजन केले होते. त्यानुसार पाच कोटी ६४ लाखांचा निधी मिळाला आहे. ९ लाख ३० हजार ३४४ पांढऱ्या आणि हिरव्या अशा दोन रंगात प्लास्टिकचे डबे खरेदी केले होते. एका डब्यासाठी सुमारे सत्तर रूपये आला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते डस्टबीन वाटपाची सुरूवात केली. त्यानंतर हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने याकामासाठी १ हजार ८८ कर्मचारी नियुक्त केले होते. नियोजनानुसार ३१ जानेवारीपर्यंत वाटप पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, वीस टक्केही वाटप पूर्ण न झाल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)