शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

रिंंगरोडमुळे जोडलेल्या गावांचा नियोजनबद्ध विकास : किरण गित्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 20:50 IST

प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडे-हांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते.

ठळक मुद्देपीएमआरडीतर्फे ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याचा विकास होणाररस्ते, पाणी, वीज, नाले सुविधा १५ महिन्यांत पूर्ण होणार

पुणे : औताडे-हांडेवाडी व होळकरवाडी या गावांचा कायापालट नगररचना योजनेच्या माध्यमातून होणार आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पूर्ण टाऊनप्लॅन (टीपी) स्कीम विकसित भूखंड स्वरुपात केली जाणार आहे. गावकऱ्यांच्या माहितीसाठी औताडे-हांडेवाडी व होळकरवाडी दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आराखड्याचे नकाशे लावले आहेत. रिंगरोडच्या माध्यमातून गावे जोडली जाऊन नियोजनबद्ध विकास केला जाणार आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. प्रादेशिक योजनेतील ११० मीटर रुंद बाह्यवळण रस्त्याच्या विकासाकरिता औताडे-हांडेवाडी प्रारूप नगर रचना परियोजना क्रमांक ३, होळकरवाडी प्रारूप नगररचना परियोजना क्रमांक ४ व ५ मधील जमीनमालकांसोबत हांडेवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) यासाठी सर्व जमीन मालकांना यासाठी बोलावले होते. याप्रसंगी पीएमआरडीएचे महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी तथा उपनियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागाचे सुहास मापारी, औताडे-हांडेवाडीच्या सरपंच सुवर्णा गायकवाड, होळकरवाडीच्या सरपंच मंगला झांबरे, माजी उपसरपंच भाऊ झांबरे, चंद्रकांत झांबरे, काका झांबरे, साधना बँकेचे संचालक आबासाहेब कापरे, माजी संचालक प्रवीण तुपे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या अनेक शंकाचे निरसन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी ग्रामस्थांना नगररचनेच्या माध्यमातून सुनियोजित विकास कशाप्रकारे साधला जाईल याविषयी माहिती दिली. या वेळी विजयकुमार गोस्वामी यांनी नगररचना योजना कशा प्रकारे केली जाते. त्याचप्रमाणे नगररचना योजनेमुळे ग्रामस्थांना कशा प्रकारे फायदा होणार आहे याबद्दल माहिती दिली. रहिवाशी झोन बदल विनामुल्य करणार असून यात पीएमआरडीए व जमीनधारकांची भागीदारी आहे. कोणीही भूमिहीन होणार नाही. बांधकाम क्षेत्रात एकरी वाढ ३२ हजार स्केअर फूटएवजी ५३ हजार स्क्वेर फूट केले जाणार आहे. रस्ते, पाणी, वीज, नाले सुविधा १५ महिन्यांत पूर्ण होणार आहे. नवीन प्लॉट नावे करून वाटप देखील १५ महिन्यात होणार आहे. यासाठी जमीन मालकासोबत पीएमआरडीए करार करणार आहे, असे किरण गित्ते यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेKiran Gitteकिरण गित्तेPMRDAपीएमआरडीए