शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
2
भाजपा नेते गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
3
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
4
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
5
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
6
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
7
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
8
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
9
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
10
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
11
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
12
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
13
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
14
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
15
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
16
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
17
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
18
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
19
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
20
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच आराखडा तयार करणार:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:27 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या जुन्नर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

ठळक मुद्दे२८० कोटी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा

पुणे:   सनई- चौघाडे, तुतारीचे स्वर, भगवे, ध्वज , फेटे, फुलांची सजावट , जय भवानी जय शिवाजी यांसारख्या घोषणांचा गगनभेदी नाद, अशा मंगलमय वातावरणात मंगळवारची पहाट शिवेनरीवर उजाडली. सर्वांना उत्सुकता होती. स्वराज्याच्या सुंदर स्वप्नांची आशा जागविणाऱ्या व त्यांना पूर्णत्वास नेणाऱ्या लाडक्या शिवबाच्या जन्मोत्सवाची..राजकीय नेते मंडळी , सामाजिक कार्यकर्ते आणि शिवरायांवर निस्सीम प्रेम करणारे स्वराज्य बांधव यांनी शिवनेरी जणू न्हाऊन निघाली होती... शिवजन्म काळ जवळ येताच उपस्थित माता भगिनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाळणा जोजवून शिवरायांचे जन्मोत्सव साजरा केला.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे , पत्रकार उदय निरगुडकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. त्यानंतर ओझर येथे हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर येथे करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. या तालुक्याला मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पार्श्वभूमी , वन्यजीव आणि मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपन्नता लाभलेली आहे. तसेच महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून राज्य सरकारतर्फे घोषित करण्यात आला आहे. तसेच दाºया घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. तसेच आंबेगव्हाण येथे बिबटया सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्यातील बुडीत बंधा?्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले. कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद बनसोडे यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्य्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.        प्रकल्पातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री व थेऊर या सहा अष्टविनायक तीर्थक्षेत्र जोडणा-या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग आहे. दरवर्षी या रस्त्यांवरून १० लक्ष भाविक यात्रा करतात. हे रस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान, बारामती तालुक्यातील मोरगाव, दौंड तालुक्यातील पाटस दौंड मार्गे सिध्दटेक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, जुन्नर तालुक्यातील ओझर व लेण्याद्री व हवेली तालुक्यातील थेऊर ही महत्त्वाची तीर्थस्थाने व बाजारपेठेची गावे आहेत.या रस्त्यांवर वाहतूक वर्दळ बऱ्यांच प्रमाणात असते व त्यामानाने डांबरी पृष्ठभागाची रुंदी अपुरी पडते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे.  या भागातील पर्यटन व शेतीमालाच्या वाहतुक वाढीस चालना मिळणार आहे.    

टॅग्स :OzarओझरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJunnarजुन्नर