आधी पाण्याचे नियोजन करा
By Admin | Updated: September 4, 2015 01:59 IST2015-09-04T01:59:34+5:302015-09-04T01:59:34+5:30
भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ

आधी पाण्याचे नियोजन करा
भोर : भोर, वेल्हे तालुक्यातील पाण्याचे जोपर्यंत योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत धरणातील पाणी खाली सोडून दिले जाणार नाही. पाण्यासाठी पाणी बचाव समिती स्थापन करून वेळ पडल्यास राष्ट्रीय महामार्गही अडवला जाईल, असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी दिला.
न्हावी येथे संग्राम थोपटे यांची जिल्हा बॅँकेच्या संचालकपदी व राजगड कारखान्याच्या अध्यक्षपदी व भोरच्या नगराध्यक्षपदी अॅड. जयश्री शिंदे यांची निवड, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार समारंभ झाला. कॉँग्रेसचे तालुकाध्य शैलेश सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, कॉँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, विठ्ठल आवाळे, दिलीप बाठे, आनंद आंबवले, पोपट सुके, सुवर्णा मळेकर, हनुमंत शिरवले, गीतांजली शेटे, किसन वीर, उमेश देशमुख, सीमा सोनवणे, के. डी. सोनवणे, अशोक शिवतरे, रामनाना सोनवणे, राजकुमार शिंदे, निसार नालबंद, शंकर धाडवे, पल्लवी सोनवणे, तुकाराम रोमण व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांनी प्रस्ताविक केले, तर धनाजी सोनवणे यांनी स्वागत केले. गावातील दलितवस्ती व मंदिराच्या विकासकामांसाठी निधी देण्याची मागणी केली.
थोपटे म्हणाले, की भोर-वेल्हे तालुक्यातील तीन धरणांचे मिळून ३८ टक्के पाणी आडवले जाते. वास्तविक भाटघर धरणाचेच पाणी बारामतीला दिले पाहिजे. मात्र, तीनही धरणांचे पाणी खाली नेले जाते. शिवाय जोपर्यंत कालवे अपूर्ण आहेत तोपर्यंत नीरा नदीने पाणी सोडण्याचा चुकीचा निर्णय विरोध असतानाही मागच्या मंत्रिमंडळाने घेतल्याने पाणी पळवले जाते. नीरा-देवघरचे पाणी भोर, खंडाळा, फलटण या लाभ क्षेत्रातील लोकांना देणे गरजेचे आहे. तरीही कालवे अपूर्ण असल्याचे कारण देत संपूर्ण पाणी खाली नेले जाते. हा इतर तालुक्यावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. सध्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी २३०० क्युसेक्सची गरज असताना मागील आठ दिवसांपासून ३ हजार क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. अधिकाऱ्यांचीही मुजोरगिरी सुरू आहे. ते सहन केले जाणार नाही.
या वेळी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक राजाराम धोंडे यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी शैलेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
(वार्ताहर)