शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस पार्किंगचा होणार आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:00 IST

शालेय वाहतुक करणाºया बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देस्कूल बस समिती : शाळा प्रशासन, पोलीस, महापालिकेवर जबाबदारीशालेय विद्यार्थी वाहतुकीवर मुख्याध्यापक, चालक आणि सहाय्यकांची कार्यशाळा

पुणे : रहदारीच्या वेळेत रस्त्यावर थांबणाऱ्या स्कूल बसमुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी स्कूलबसच्या तात्पुरत्या पार्किंगबाबत आराखडा करण्याचा निर्णय जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक करण्यासाठी उच्च न्यायालयाने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्र्षांतील कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा स्कूल बस समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, आनंद पाटील, अनिल वळीव, वरीष्ठ वाहतूक विभागातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय बाजारे, शिक्षण विभागातील अधिकारी गौतम शेवाडे, माणिक देवकर या वेळी उपस्थित होते. शालेय वाहतुक करणाऱ्या बसला ठराविक वेळेपुरती तात्पुरती पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे, त्यासाठी पोलीस विभाग, शालेय व्यवस्थापन आणि महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थी वाहतुकीवर मुख्याध्यापक, चालक आणि सहाय्यकांची कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. आपला मुलगा-मुलगी कोणत्या स्कूल बसमधून अथवा वाहनातून शाळेत जातात. त्याची आसनक्षमता काय आहे, चालक कसा आहे याची सर्व माहिती पालकांनी घ्यावी. विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बसचा वापर करु नये असे आवाहन उपप्रादशिक परिवहन अधिकारी राऊत यांनी केले. विद्यार्थी वाहतुकीबाबत पालकांमध्ये जागृती व्हावी या साठी जागो पालक जागो हे ब्रीदवाक्य घेऊन अभियान राबविण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीParkingपार्किंग