शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू व्यवसायाच्या वादातूनच ‘त्यांनी’ रचले खुनाचे कटकारस्थान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:53 IST

देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एकाचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.

ठळक मुद्देपोलीस कोठडीत असताना अटक आरोपींची पोलिसांकडे कबुली 

यवत :  दौंड तालुक्यातील देलवडी येथे काही दिवसांपूर्वी वाळू व्यवसायाच्या वादातून एक खून झाला होता. या खुनाचा कट पुण्यातील एका हॉटेलमध्ये रचला गेला असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी या खून प्रकरणात लावलेल्या कलमांमध्ये कट रचण्याचे कलम वाढविले असून यात आणखी एक आरोपी वाढला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. स्वप्नील उर्फ पिंटू ज्ञानदेव शेलार (वय - ३०) याचा दगडाने ठेचून व धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.याप्रकरणी यवत पोलिसांनी काही तासातच तपासाची जोरदार चक्रे फिरवत सोमनाथ विष्णू शेलार,  विशाल उर्फ बाबू मेमाणे , रणजित उर्फ बाबू वांझरे , बबलू विश्वास डेंगळे व अनिल उर्फ सुनील शितोळे यांना अटक केली होती. या सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी काही तासातच खुनाचा तपास लावून पाच आरोपींना अटक केली होती. तर फिर्यादीत नमूद केलेले आरोपी असलेले चौघे आरोपी फरारी झाले होते. पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू व्यवसायच्या वादातून यापूर्वी राहू येथे दुहेरी खून घडला होता. दिवसा ढवळ्या दोघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपी संतोष संपत जगताप व समीर संपत जगताप यांचा देलवडी येथे युवकाच्या खुनात सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद होते. ते दोघे अजूनही फरार आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून