कचरा डेपोची जागा नगर परिषदेची की रेल्वेची?

By Admin | Updated: April 29, 2017 03:55 IST2017-04-29T03:55:18+5:302017-04-29T03:55:18+5:30

दौंड शहराच्या कचरा डेपो परिसरातील जागेचा वाद ५0 वर्षांनंतर उफाळून आला आहे. सदरची जागा नगर परिषदेची की रेल्वेची या वादावरून भविष्यात

The place of the garbage depot is that of the Railway Council? | कचरा डेपोची जागा नगर परिषदेची की रेल्वेची?

कचरा डेपोची जागा नगर परिषदेची की रेल्वेची?

मनोहर बोडखे / दौंड
दौंड शहराच्या कचरा डेपो परिसरातील जागेचा वाद ५0 वर्षांनंतर उफाळून आला आहे. सदरची जागा नगर परिषदेची की रेल्वेची या वादावरून भविष्यात संघर्ष होणार असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.
दौंड-सिद्धटेक रस्त्यावर भीमनगरच्या परिसरात कचरा डेपो आहे. गेल्या ५0 वर्षांपूर्वी या कचरा डेपोसाठी दौंड नगर परिषदेने भाडेतत्त्वावर जागा घेतलेली आहे. परंतु कचरा डेपोच्या परिसरातील काही जागेवर रेल्वे खात्याने भिंत उभारण्यासाठी मोठी चारी खोदली आहे. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सदरची जागा ही रेल्वेच्या मालकीची आहे. तर नगर परिषद म्हणते गेल्या ५0 वर्षांपासून या जागेचा ताबा आमच्याकडे आहे. तेव्हा कचरा डेपो परिसरातील या जागेसंदर्भात अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे खात्याने या जागेत भिंत उभारण्यासाठी खोदाई काम सुरू केल्याचे नगर परिषदेच्या लक्षात आल्यानंतर हे काम थांबविण्यासाठी नगर परिषदेने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविलेले आहे.
दौंड नगर परिषद हद्दीतील कचरा डेपो येथे सुरू असलेल्या कंपाऊंड वॉलच्या कामाची नगर पालिकेची कुठलीही परवानगी न घेता
रेल्वे खात्याने कामाला सुरुवात
केली आहे.
कचरा डेपो येथे गेल्या ५0 वर्षे कचरा टाकला जातो आणि ही जागा नगर परिषदेने भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. तेव्हा रेल्वे खात्याने तातडीने याबाबत नगर परिषदेकडे संपर्क साधावा आणि संबंधित वॉल कंपाऊंड उभारणीचे काम स्थगित ठेवावे, असे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तर दुसरीकडे नगर परिषदेच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे की, ५0 वर्षांपूर्वी कचरा डेपोची जागा नगर परिषदेने भाडेतत्त्वावर घेतली आहे. याची माहिती अद्याप रेल्वेला नाही.
तेव्हा नगर परिषद वापरात असलेल्या कचरा डेपोच्या परिसरातील काही जागा बेकायदेशीर आहे. संबंधित जागा रेल्वे खात्याची आहे. याबाबतची कागदपत्रे आपणाकडे पाठविले जातील, असे रेल्वे प्रशासनाने नगर परिषदेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: The place of the garbage depot is that of the Railway Council?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.