जागा १८, इच्छुक १६३
By Admin | Updated: June 13, 2015 23:52 IST2015-06-13T23:52:25+5:302015-06-13T23:52:25+5:30
महापालिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडे सहा प्रभागांकडून स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीसाठी १६३ अर्ज आले आहेत.

जागा १८, इच्छुक १६३
पिंपरी : महापालिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडे सहा प्रभागांकडून स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीसाठी १६३ अर्ज आले आहेत. यातून १८ पदे निवडली जाणार आहेत. यामध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१२च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून क्षेत्रीय स्वीकृत सदस्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले होते. सहा प्रभागांवर सामाजिक कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवडण्यात यावे, अशी मागणी त्या वेळी होत होती. तीन वर्षांनंतर स्वीकृत सदस्यांची निवड होत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये ३ सदस्य निवडले जाणार आहेत. प्रत्येकी ३ याप्रमाणे १८ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)