- लक्ष्मण मोरे- पुणे : पावसाच्या तडाख्यात शहरभरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा उघड झाला असून जागोजाग खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. महापालिकेच्या ‘दर्जेदार’ कामाचे नमुने असलेले हे खड्डेसुद्धा तेवढेच ‘महाग’ ठरत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत शहरातील २२०० खड्ड्यांवर पथ विभागाकडून तब्बल ५२ लाखांचा खर्च करण्यात आला असून पालिकेला एक खड्डा २ हजार ३६३ रुपयांना पडला आहे. पालिकेने पावसाळ्यातही खड्डे बुजविण्यासाठी आणलेल्या केमिकल्सयुक्त काँक्रिटचाही फज्जा उडाला असून पाण्यासोबत करदात्यापुणेकरांचा पैसाही खड्ड्यांमध्ये जिरू लागल्याचे चित्र आहे. अद्यापही लाखो खड्डे रस्त्यावर असून त्यावर पालिका किती पैसा जिरवणार, असा प्रश्न आहे.
* ठेकेदार आणि पालिकेच्या पथ विभागाकडून या गोष्टींचा वापर करून खड्डे भरण्यात येत आहेत; परंतु आतापर्यंत भरलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने या सर्व गोष्टींचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...* नवनवीन गोष्टी पुढ्यात आणून खर्चाचे आकडे फुगविण्यात वाकबगार झालेल्या यंत्रणेचा ‘इंटरेस्ट’ खड्डे बुजविण्यात आहे की ठेकेदारांचे हित जपण्यात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ............पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत २२०० खड्डे बुजविण्यात आले असून खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत ५२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डे बुजविण्यासाठी कॅटेनिक इमल्शन, कोल्ड मिक्स, केमिकल काँक्रिटसह १०० एमएमच्या पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे; परंतु पावसामुळे हे केमिकल सुकत नसल्याने अडचणी येत आहेत. - अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग.......ही डागडुजी तात्पुरती आहे. आतापर्यंत किती खड्डे बुजविले, शहरात नेमके किती खड्डे आहेत, याची आकडेवारीच प्रशासनाकडे नाही. सुरुवातीला रस्त्यांची कामे वाईट केली. आता खड्ड्यांवर खर्च होतोय. हा खर्च पावसाळा संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यानंतर पुन्हा पक्क्या कामासाठी खर्च केला जाईल. अशा प्रकारे एकाच कामासाठी तीन-तीन वेळा पैसे खर्च करण्याचे काम अधिकारी करीत आहेत. पुणेकरांचा पैसा खड्ड्यांत घालण्याचे काम अधिकारी इमाने-इतबारे करीत आहेत. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच...